Advertisement

येत्या ३ दिवसांत करणार शिक्षकांचे पगार- शिक्षणमंत्री

पाडव्याच्या दिवशी शिक्षकांचं वेतन होऊ शकलं नाही, याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. परंतू, शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील प्रक्रिया सुरु असून, येत्या ३ दिवसांत शिक्षकांचं वेतन होईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.

येत्या ३ दिवसांत करणार शिक्षकांचे पगार- शिक्षणमंत्री
SHARES

शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या प्रकरणी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यांनतर, अनेक शिक्षकांच्या खाते बदलाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या प्रक्रियेला स्वाभाविकपणे काही कालावधी लागणार होता. या प्रक्रियेमुळे पाडव्याच्या दिवशी शिक्षकांचं वेतन होऊ शकलं नाही, याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. परंतू, शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील प्रक्रिया सुरु असून, येत्या ३ दिवसांत शिक्षकांचं वेतन होईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.


कपिल पाटील यांच्या हट्टामुळे

विधानभवनात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, ''मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व प्रक्रियापूर्ण व्हायला २०-२५ दिवस लागतात, त्यामुळे या महिन्यापुरता जुन्याच मुंबई बँकेमधून वेतन काढण्यात यावा, असे विभागाचे म्हणणे होते. परंतु शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हट्टापायी शिक्षकांचं वेतन होऊ शकलं नाही, काही जणांचा हट्ट युनियन बँकेचा होता, त्यामुळे हा उशिर झाला ही वस्तूस्थिती आहे'', असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.


निकाल कायम

शिक्षकांच्या वेतनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे उरलेली कार्यवाही पूर्ण करुन शिक्षकांचं वेतन ३ दिवसांत मिळेल, असं तावडे यांनी सांगितलं.


मुंबईतील २७ हजार शिक्षकांचे वेतन कोणत्या बँकेतून करावे? हे सोमवारी सुप्रीम कोर्टात स्पष्ट झाल्याने आता काहींचा श्रेयवाद संपला आहे. या श्रेयवादाच्या लढाईत नाहक भरडलेल्या मुंबईतील शिक्षकांचं वेतन २४ तासात त्यांच्या खात्यात जमा करावं.
- अनिल बोरनारे, शिक्षक परिषद



हेही वाचा-

जीआर काढून १० दिवस उलटले, शिक्षक अजूनही वेतनाच्या प्रतिक्षेत

माध्यमिक शिक्षकांना हवी कार्यरजा, चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मिळेल प्रोत्साहन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा