Advertisement

मुंबईतील शिक्षकांचा पाडवा गोड नाहीच!

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून ९ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आला आहे. मात्र शिक्षणमंत्री आणि सचिवांच्या आडमुठ्या धोरणामुळे अद्यापही शिक्षकांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत.

मुंबईतील शिक्षकांचा पाडवा गोड नाहीच!
SHARES

गुडीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्ष साजरं करताना घरात गोडधोड करण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र मुंबईतील अनेक शिक्षक त्याला अपवाद ठरणार आहेत. त्याचं कारण म्हणजे गेल्या २ महिन्यांपासून मुंबईतील २७ हजार हजार शिक्षकांचा अजून पगारच झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उत्साहावर जणू विरजनच पडलं आहे.


हायकोर्टाच्या आदेशाला बगल

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला असूनही अद्याप शिक्षकांचे पगार करण्यात आले नाहीत. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शिक्षकांच्या नवीन वर्षाची सुरूवात गोड होणार नाही असंच दिसत आहे.


आडमुठं धोरण

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा राज्य सरकारचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून ९ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आला आहे. मात्र शिक्षणमंत्री आणि सचिवांच्या आडमुठ्या धोरणामुळे अद्यापही शिक्षकांचे पगार त्यांच्या बँकेत जमा झालेले नाहीत.


शिक्षकांचा छळ सुरूच

शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत. न्यायालयाचे आदेश मानत नाहीत. हे अनाकलनीय आणि भयंकर असून मुंबईच्या शिक्षकांचा छळ सुरू आहे.
- कपिल पाटील, शिक्षक आमदार


शिक्षण सचिव खोटारडे

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही विचारणा झाली असून आपण सुप्रीम कोर्टात जाणार नाही आणि शिक्षकांचे पगार लवकरच देऊ, असं आश्वासन देऊन संबंधितांना सूचनाही केल्या. मात्र मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही, असं सांगणारे सचिव नंदकुमार खोटं बोलत असल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यानी १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा निर्देश देऊनही शिक्षकांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने या महिन्यात शिक्षकांचे पगार होणार नाहीत अशी स्थिती असल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं.


आरोप चुकीचे

न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर विधी व न्याय खात्याच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. शिक्षकांची जुन्या बँकेतील खाती नवीन बँकेत बदलण्याची प्रक्रिय सुरू असून त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे ठाण्यातील शिक्षकांचे पगार काढण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईतील शिक्षकांचे पगार काढण्यात येतील. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पगार काढण्यात येतील. कपिल पाटील यांचे आरोपी चुकीचे आहेत.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री


हेही वाचा-

हायकोर्टाचे तावडेंंवर ताशेरे, शिक्षकांचा पगार मुंबै बँकेत नाही!

शिक्षकांचे पगार पुन्हा रखडणार, 'शालार्थ' यंत्रणा बंदच

शिक्षकांच्या पगारासाठी मुंबै बँकच का ?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा