Advertisement

सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्तीही अभिनय क्षेत्रात !


सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्तीही अभिनय क्षेत्रात !
SHARES

मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कपल्स आहेत, जे दोघेही सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये काम करतात. आता या यादीत अजून एका कलाकाराच्या बायकोचं नाव सामील होणार आहे. सिद्धार्थ जाधवची बायको तृप्ती जाधव आता लवकरच आपल्याला एका शॉर्ट फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे.

या आधी सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीने नुकताच 'नच बलिये' या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात या दोघांनीही खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यांच्या सगळ्याच परफॉर्मन्सचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. सिद्धार्थ एक चांगला कलाकार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण तृप्तीने देखील या कार्यक्रमाद्वारे ती एक चांगली कलाकार, डान्सर असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळेच तिला आता अभिनयाची ऑफर आली असून तिने ही ऑफर स्वीकारली देखील आहे.



या शॉर्ट फिल्मचे नाव 'चाबी' असे आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये चार व्यक्तिरेखा महत्त्वाच्या असणार आहेत आणि या चार व्यक्तिरेखांपैकी एक भूमिका तृप्ती साकारणार आहे. ही एक हिंदी शॉर्ट फिल्म असून तृप्तीच्या करिअरमधली ही पहिलीच शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यासाठी तृप्ती सध्या खूप उत्सुक आहे.



तृप्तीने कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिकांमध्ये अभिनय केला होता. पण नंतरच्या काळात नोकरी करत असल्याने तिला पुढे ते करणं शक्य झालं नाही. आता पुन्हा १०-१२ वर्षांनंतर तृप्ती अभिनय क्षेत्राकडे वळली असून 'चाबी' या शॉर्ट फिल्ममध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तिला या शॉर्ट फिल्मबद्दल प्रितम यांनी नच बलियेच्या दरम्यान विचारले होते. तृप्तीला अनेक वर्षांनंतर अभिनय करण्याची संधी मिळत असल्याने तिने लगेचच या शॉर्ट फिल्मसाठी होकार दिला.



हेही वाचा

ही 'लूजर वाली गरबा स्टेप' काय भानगड आहे भाऊ?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा