Advertisement

चौपाटींच्या स्वच्छतेसाठी आता जुहू मॉडेल!

जुहूमधील रहिवासी संघटनांचं मत विचारात घेऊन त्यांच्या सूचनांनुसारच महापालिकेनं स्वच्छतेचं कंत्राट काढलं आहे. नागरिकांच्या सूचनांनुसार काढलेलं जुहू चौपाटीचे हे पहिलेच कंत्राट असून यामध्ये जास्तीत जास्त अत्याधुनिक यांत्रिक झाडूचा वापर करत जुहू चौपाटीची स्वच्छता राखली जाणार आहे.

चौपाटींच्या स्वच्छतेसाठी आता जुहू मॉडेल!
SHARES

मुंबईतील चौपाटींच्या स्वच्छतेबाबत सर्वच स्तरावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता थेट नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन त्याप्रमाणेच चौपाटीची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेनं पाऊल उचललं आहे. जुहूमधील रहिवासी संघटनांचं मत विचारात घेऊन त्यांच्या सूचनांनुसारच महापालिकेनं स्वच्छतेचं कंत्राट काढलं आहे. नागरिकांच्या सूचनांनुसार काढलेलं जुहू चौपाटीचं हे पहिलंच कंत्राट असून यामध्ये जास्तीत जास्त अत्याधुनिक यांत्रिक झाडूंचा वापर करत जुहू चौपाटीची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील चौपाटी स्वच्छतेसाठी जुहू चौपाटीच्या स्वच्छतेचं मॉडेल वापरलं जाणार आहे.


चौपाटीच्या स्वच्छतेसाठी नव्यानं कंत्राटदाराची निवड

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारपट्टीवरील कचरा साफ करण्यास अफरोझ शाह याने नकार दिल्यामुळे चौपाटीच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी नव्यानं कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहे.


याला महापालिकाच जबाबदार राहणार

जुहू चौपाटीची स्वच्छता राखण्यासाठी जुहू रेसिडेन्स असोसिएशनकडून आलेल्या सूचनांचा विचार करूनच त्याप्रमाणे कंत्राट निविदा मागवल्या आहेत. यावेळी चौपाटीची स्वच्छता राखताना अत्याधुनिक यांत्रिक झाडूंचा जास्तीत जास्त वापर करताना ठराविकच कचरा एका पाळीत उचलण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. एका पाळीत जेवढा कचरा निघेल, तेवढा कंत्राटदाराला काढावा लागणार आहे. त्यामुळे कधी कमी तर कधी जास्त कचरा निर्माण होईल. पण हा सर्व कचरा साफ करून चौपाटीचा परिसर स्वच्छ राखणे, याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार आहे. त्यामुळे जास्त कचरा निर्माण झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.



हेही वाचा

चिंबई, वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यांचीही होणार स्वच्छता

समुद्रासह किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण करणार तयार - मुख्यमंत्री


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा