Advertisement

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात
SHARES

मुंबई आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसानं जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागाड मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर भागात अधून-मधून पासाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज नक्की घ्या आणि शक्य असल्यास आज प्रवास टाळा.

हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे. तर येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, गणरायाच्या आगमना दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे.

हेही वाचा : मुंबईतल्या सातही धरणांमध्ये ६० टक्के पाणीसाठा

१९ ऑगस्टपासून उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या २४ तासांत पावसाचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढच्या 3-4 दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या ४ ते ५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात ५ जिल्हे वगळता सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून ६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दहा बारा दिवसांत साधारण तीन महिन्याचा पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवापर्यंत धरणात ८ लाख ७० हजार दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता.हेही वाचा

स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा

माहुल गावात प्रदूषण करणाऱ्या ४ कंपन्यांना २८६ कोटींचा दंड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा