आयसी कॉलनीचा कायापालट करणारा 70 वर्षांचा तरुण!

Borivali
आयसी कॉलनीचा कायापालट करणारा 70 वर्षांचा तरुण!
आयसी कॉलनीचा कायापालट करणारा 70 वर्षांचा तरुण!
आयसी कॉलनीचा कायापालट करणारा 70 वर्षांचा तरुण!
आयसी कॉलनीचा कायापालट करणारा 70 वर्षांचा तरुण!
See all
मुंबई  -  

ठिकठिकाणी पडलेला कचरा, दुर्गंधी, डासाांचा प्रादुर्भाव...मुंबईतल्या कोणत्याही झोपडपट्टी परिसरात दिसणारं हे चित्र.. पण कोणे एके काळी बोरिवलीच्या गावठाणमध्येही हीच परिस्थिती होती. बोरिवलीच्या आयसी कॉलनी आणि मरिना कॉलनीमध्ये अस्वच्छता, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, कचऱ्याचं साम्राज्य आणि लोकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची अनास्था. पण त्याहूनही सगळ्यात गंभीर बाब म्हणजे परिसरात वाढत असलेला इ कचरा! पण हे चित्र कालांतराने बदललं. आणि त्याला कारणीभूत ठरले 70 वर्षांचे लॉवेल लॉरेन्सस!

तुम्हाला वाटेल की यात 70 वर्षांच्या या वृद्धानं असं काय केलं? 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम' ही इंग्रजी म्हण त्यांनी खरी करुन दाखवली आहे. 2008 साली, म्हणजे लॉवेल 60 वर्षांचे असताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली! वय झाल्यामुळे थकून माघार घेणारे वृद्धच काय, पण अगदी तिशीतल्या तरुणांनाही लाजवेल असा तो निर्णय होता. पण त्यांनी ती गोष्ट मनावर घेतली होती.

लॉवेल यांचं असं ठाम मत होतं, की परिसर स्वच्छ राहिला, तरच देश प्रगती करेल. आणि याच विचारातून त्यांनी स्वत:च्या घरापासूनच या आगळ्यावेगळ्या मोहिमेला सुरुवात केली. घरातल्या कचऱ्याचं लॉवेल वर्गीकरण करत असत. ओला आणि सुका कचरा वेगळाच ठेवण्याचा त्यांचा आग्रह असतो. लॉवेल यांनी नंतर वेगळ्या केलेल्या ओल्या कचऱ्यापासून खत बनवून परिसरातल्याच झाडांना टाकायला सुरुवात केली.


लहानपणापासून परिसरात स्वच्छता असावी असं वाटायचं. पण कुणीच पुढाकार घ्यायचं नाही. कालांतराने परिस्थिती बदलली, पण लोकांच्या सवयी बदलत नव्हत्या. त्यासाठी खूप मेहनत घेतली. आज हा संपूर्ण परिसर पूर्णपणे हरित आणि स्वच्छ आहे.

लॉवेल लॉरेन्सस

हळूहळू ही संकल्पना स्थानिक लोकांपर्यंत पोहोचली. इतर काही जणांनीही अशाच प्रकार कचऱ्यापासून खत बनवून झाडांना टाकायला सुरुवात केली. हे काम पुढे मुंबई महानगर पालिकेच्या अॅडव्हान्स लोकॅलिटि मॅनेजमेंटच्या प्रकल्पाचा भाग बनलं. यात इलेक्टॉनिक वेस्ट, बायो वेस्ट, ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे असे उपक्रम केले जाऊ लागले.

संपूर्ण मुंबईत एएलएम अर्थात अॅडव्हान्स लोकॅलिटि मॅनेजमेंटकडून अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राबवले जातात. मुळात लोकसहभागातून लोककार्य हेच एएलएमचं प्रमुख कार्य असल्यामुळे एएलएमने सुरु केलेल्या अशा अनेक प्रकल्पांना स्थानिकांचा पाठिंबाही मिळू लागला आहे. त्यामुळे 1998 साली सुरु झालेला एएलएमचा प्रवास आज मुंबईच्या अनेक भागांमध्ये स्वच्छता पाळली जाण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.


घाटकोपरमधून 1998 साली एएलएमची सुरुवात झाली. आज मुंबईतल्या विविध भागांमध्ये स्वच्छता आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे एएलएम पालिकेचं लक्ष वेधत आहेत.

सुभाष पाटील, एएलएम
हेही वाचा

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे वरळी हिलचे बाबुजी!

स्लेटररोड 'एएलएम'ला हवीय तरूण पिढीची साथ

मुंबईच्या स्वच्छतेचा ध्यास...एएलएम!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.