Advertisement

धक्कादायक...मुंबईतले तलाव झाले गायब!


SHARES

मुंबईतील उरलेसुरलेले तलावही आता शेवटची घटीका मोजत असल्याची धक्कादायक माहिती ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. 

‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने मुंबईच्या आराखड्याचा काही दिवसांपूर्वी अभ्यास केला. त्यातून मुंबईत आधी अस्तित्वात असलेल्या ८६ तलावांपैकी ६६ तलाव अक्षरश: दिसेनासे झाले असून केवळ २० तलावांचं अस्तित्व उरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातही जवळपास ८ तलावांचा पूर्णपणे नाश झाल्याचं स्पष्ट होत आहे.

ही संपूर्ण माहिती ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने महापालिका आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना इ-मेल द्वारे पाठवली. पण, अजूनही संबंधित यंत्रणांकडून याबद्दल काहीच प्रतिसाद आलेला नसल्याचं वॉचडॉग फाऊंडेशन कडून सांगण्यात आलं आहे.




आम्ही मुंबईच्या विकास आराखड्याचा अभ्यास केला. त्यात डीपी शीट्समधून आम्हाला मिळालेली माहिती धक्कादायक होती. मुंबईतील जवळपास ८ तलाव हे पूर्णपणे नाहिसे झाले आहेत. तलावाचा आधी पाणी साठवण्यासाठी उपयोग व्हायचा. कधी दुष्काळ परिस्थिती उद्भवली तर त्याचा फायदा मुंबईकरांना करता आला असता. 

- गाॅडफ्रे पिमेंटा, वाॅचडाॅग फाऊंडेशन




शिवाय, या तलावावर लोकांनी अतिक्रमणं केली आहेती. हे तलाव म्हणजे मुंबईला निसर्गानं दिलेली देणगी होती. त्यामुळे नष्ट झालेले तलाव पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची गरज असल्याचं पेग्मेंटा यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.   


मुंबईत आधी खूप तलाव होते. पण, आता एकही तलाव शिल्लक नाही हे सत्य आहे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी या तलावांचा उपयोग व्हायचा. पण, आता हे तलाव नष्ट करून त्यावर इमारती किंवा मोठमोठी बांधकामं सुरू आहेत. ज्याचा परिणाम आपल्याला अजून काही वर्षांनी भोगावा लागणार आहे. 

-स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्ती प्रकल्प


मेट्रोसाठी जमिनीच्या १०० फूट खाली खोदकाम करावं लागतं. म्हणजे आपण किती मोठ्या प्रमाणात जमीन आणि पर्यावरणाचा ऱ्हास करतोय याचा विचारही करत नाही आहोत. सिमेंट, काँक्रिटीकरणाच्या विश्वात आपण एवढे रमलो आहे की पृथ्वीचा नाश होण्यासाठी आपणच जबाबदार असू. 



हेही वाचा -

झाडे हवीत, तर जंगलात जा!

मुंबईच्या रस्त्यांवर परदेशी नकोत, भारतीय झाडे लावा़ - सभागृहनेते



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा