Advertisement

गणेशोत्सवात ४५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबईतील मत्त्वाची गणेशोत्सव मंडळं, प्रसिद्ध मंदिरं, नेत्यांचे पुतळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेत. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर टोल नाक्यांद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे. उत्सव काळात मौल्यवान दागिने घालून फिरणाऱ्या महिलांना पोलिसांनी भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

गणेशोत्सवात ४५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त
SHARES

राज्यात घातपाती कारवाई आणि शहरी नक्षलवादाने डोके वर काढल्याने गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये, या दृष्टीकोनातून या काळात शहरात ४५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. शहरातल्या महत्वाच्या आणि गर्दीच्या गणेश मंडळांच्या ठिकाणी होणारे गैर प्रकार रोखण्यासाठी महिला छेडछाड पथक, महिला बीट मार्शल आणि साध्या वेशातील पोलिस पाळत ठेवणार आहेत.


अॅक्शन प्लान तयार

मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींच्या आढावा घेतल्यास सणासुदीच्या काळात समाजकंटकांकडून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी  'अॅक्शन प्लान' तयार केला आहे. त्याचबरोबर सर्व मंडळांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय उपाय योजना परिसरात असायला हव्यात याचं मार्गदर्शन केलं आहे. तसंच महत्त्वाच्या ठिकाणी राखीव दलाचे पोलिस, बॉम्ब स्कॉड, श्वान पथक तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिस नजर ठेवणार आहेत.

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द 

मुंबईतील मत्त्वाची गणेशोत्सव मंडळं, प्रसिद्ध मंदिरं, नेत्यांचे पुतळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेत. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर टोल नाक्यांद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे. उत्सव काळात मौल्यवान दागिने घालून फिरणाऱ्या महिलांना पोलिसांनी भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यासाठी उत्सवकाळात नाकाबंदीही करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या कालावधीत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.


४९ रस्ते बंद 

उत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ४९ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहेत, तर १८ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ९९ मार्गांवर वाहने उभी करण्यास वाहतूक पोलिसांनी मनाई केली आहे. विशेष म्हणजे लोअर परळचा ब्रीज बंद झाल्याने ना.म.जोशी मार्ग आणि भायखळा परिसरातील अनेक गणेश मंडळांना विसर्जनासाठी करीरोड ब्रिजहून भारमाता जंक्शन मार्गे डॅा. बाबासाहेब आंबेडकर रस्तामार्गे शिवाजी पार्कला जावे लागेल किंवा सात रस्तामार्गे फिरून जावं लागणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा -

यंदा लालबागच्या राजा विराजमान होणार प्रभावळविना

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं ९९ व्या वर्षात पदार्पण; नव्या बोधचिन्हाचं अनावरण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा