Advertisement

...हीच पाने गणपतीला का वाहतात?


...हीच पाने गणपतीला का वाहतात?
SHARES

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरगुती आणि मंडळांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केल्यानंतर पूजाविधी करताना गणपतीला 21 वनस्पतींची पाने वाहिली जातात. ही पाने वाहण्यामागेही आयुर्वेदिक विचार आहे. या पानांमधील औषधी गुणधर्म बघितल्यास ती किती उपयोगी आहे, याची प्रचिती येते.

दूर्वा - हा गवताचाच एक प्रकार असून ही तृण वनस्पती आहे. डोळे आल्यावर दुर्वांचा रस डोळ्यात घातल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो. शिवाय, त्वचाविकार, जखमा भरून काढण्यासाठी दूर्वांचा वापर केला जातो. वारंवार गर्भपात होण्याची समस्यादेखील दूर्वाकल्पाच्या सेवनाने कमी होते.



केतकी - म्हणजेच केवडा, हे अत्यंत सुंगधित फूल. विविध त्वचाविकारांवर हे फूल वापरले जाते.

भृंगराज - माक्याचे म्हणजेच भृंगराज तेल. जे केस काळे ठेवायला मदत करते. कावीळ, पंडुरोग, जंत यावर माका उपयुक्त आहे.



बिल्व - म्हणजेच बेलपत्र. बेलाच्या पानाचा वापर सूज उतरवण्यासाठी केला जातो. जुलाब, आव पडणे यासाठी कच्चे बेलफळ उपयुक्त आहे. तोंड आले असेल, तर बेलाच्या सालीचा काढा करून गुळण्या केल्यास फरक पडतो. उलटी होत असल्यास बेलाचा काढा थंड करुन मध घालून प्यावे.

तुळस - हिरड्यांतून पू येत असेल तर तुळशीची पाने चघळावीत. तुळस डासांना दूर ठेवण्यास मदत करते. सर्दी- खोकल्यात तुळस अत्यंत उपयुक्त ठरते.

धोतरा - धोतरा ही एक विषारी वनस्पती आहे. काही विशिष्ट प्रक्रिया केल्यावर विषारीपणा घालवल्यानंतरच ही वनस्पती आयुर्वेदात वापरली जाते. खोकला, दमा, अतिसार यावर धोतराचा वापर केला तर फरक जाणवतो.

विष्णुक्रान्ता - नील शंखपुष्पी...हिचा उपयोग मानसिक रोगांवर केला जातो. लघवी साफ न होणे किंवा गर्भाशय दौर्बल्यामुळे गर्भधारणा न होण्याच्या तक्रारीवरही ही उपयुक्त आहे.



आयुर्वेदात बऱ्याच वनस्पतींचा वापर औषध बनवण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्या आपल्याला माहितही नसतात. म्हणून मग आपण बरे नसले की बाहेरच्या गोळ्या किंवा औषधांचा वापर करतो. शिवाय सर्वांची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ला घेतला, तर अधिक सोपे होईल. जे औषध मला योग्य असेल ते तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून सल्ला महत्त्वाचा ठरतो.

डॉ. परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती



हेही वाचा - 

श्रावण मासी..हर्ष मानसी!

यंदाच्या गणेशोत्सवात दरवळणार 'या' अगरबत्त्यांचा सुगंध!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा