Advertisement

यांच्या 'डोळस' दृष्टीला सलाम!


यांच्या 'डोळस' दृष्टीला सलाम!
SHARES

'शाडूच्या मूर्ती बसवा, इको फ्रेंडली पद्धतीने उत्सव साजरा करा', असे आवाहन होत असताना देखील आजही मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. आपण बाप्पाचे विसर्जन तर करतोच, पण नंतर त्या मूर्तीचे काय होते, याकडे कोणीच बघत नाही. त्याचप्रमाणे बाप्पाला विसर्जनाला आणताना त्यासोबत आलेले निर्माल्यही समुद्राच्या पाण्यातच सोडले जाते.

याचाच परिणाम विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बघायला मिळतो. संपूर्ण किनारपट्टीचे रुपांतर कचरापेटीत झालेले असते. किनारपट्टीवर बाप्पाचे भग्न अवषेश बघायला मिळतात. किनारपट्टीवरील ही अस्वच्छता दृष्टीहिनांना दिसत नाही. पण त्याची जाणीव मात्र काही दृष्टीहीन मुलांना झाली. त्यामुळेच दादर चौपाटीवर 50 दृष्टीहीन मुलांनी समुद्र किनारा स्वच्छ केला.

आम्ही कोणतीही कामे करू शकतो. डोळस व्यक्तींपेक्षा आम्ही कशातच कमी नाही, हे आज आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले. जी गोष्ट आम्हा दृष्टीहिनांना दिसते, ती डोळस व्यक्तींनी नजरेआड करू नये. उत्सव साजरा करा, पण सामाजिक भानही पाळा.

देवेंद्र पोन्नलगर, अध्यक्ष, नयन फाउंडेशन

2010 पासून नयन फाऊंडेशन ही दृष्टीहीन मुलांची संस्था काम करत आहे. या फाऊंडेशनने आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.

ट्रेकिंग असो वा वृक्षारोपण, पण समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे निसर्गावर विघ्न येऊ नये, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.

शार्दुल म्हाडगुत, विश्वस्त, नयन फाउंडेशन



हेही वाचा - 

'निर्माल्य द्या, खत घ्या', महापालिकेचा अनोखा उपक्रम

आक्सा समुद्रकिनारी साचलंय निर्माल्य


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा