Advertisement

कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध? २० डिसेंबरला पालिकेची नियमावली

न्यू ईयर आणि ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अनेक लोकं घराबाहेर पडतात. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे.

कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध? २० डिसेंबरला पालिकेची नियमावली
SHARES

कोरोनामुळे यंदा ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. न्यू ईयर आणि ख्रिसमससाठीची मुंबई महापालिकेची नियमावली २० डिसेंबरला जाहीर होणार आहे.

न्यू ईयर आणि ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अनेक लोकं घराबाहेर पडतात. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यू ईयर निमित्ताने होणाऱ्या सार्वजनिक आणि सामुदायिक जल्लोषाला यंदा प्रथमच ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मरीन ड्राईव्ह, सीफेस यासह इतर सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. नाईट क्लब, हॉटेल्ससाठीही कडक नियम बनवले जाऊ शकतात. 

नाईट क्लब आणि हॉटेल्समध्ये नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं महापालिकेच्या कारवाईत समोर आलं आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताला अधिक कडक नियम लागू होऊ शकतात. दिवाळीप्रमाणे ख्रिसमस आणि न्यू ईयरला मरीन ड्राईव्ह, वरळी सी-फेससह मुंबईतील इतर चौपाट्यांवर एकत्र येऊन जल्लोष करण्यास मनाई करण्यात येणार आहे. चौपाट्यांवर हजारोंचा जमाव जमू नये म्हणून मुंबई महापालिकेने या हालचाली सुरू केल्याचं समजतं.

पालिकेने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नाईट क्लब आणि हॉटेल्सवर धाड घालण्यास सुरुवात केली असून नाईट क्लबमध्ये मास्क न लावता हजारो लोक एकत्र येत असल्याचं आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या दिवशीही हजारो लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. 



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा