Advertisement

मुंबईत मोहरम ताजिया मिरणुकांना सशर्त परवानगी!

महाराष्ट्रातील इतर भाग वगळून केवळ मुंबईतच मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.

मुंबईत मोहरम ताजिया मिरणुकांना सशर्त परवानगी!
SHARES

महाराष्ट्रातील इतर भाग वगळून केवळ मुंबईतच मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. ही मिरवणूक काढताना आयोजकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि इतर कोरोनासंदर्भातील खबरदारीच्या उपायोजना कराव्या लागतील, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. (bombay high court allowed muharram tazia procession in mumbai)

याआधी मोहरम ताजिया मिरवणूक काढण्याच्या मागणीसाठी लखनौतील मुस्लीम समुदायातील काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे. एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता, असं सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना म्हटलं होतं.  

हेही वाचा- मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीस परवानगी नाही

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अटी-शर्थींच्या आधारे अत्यंत साधेपणाने सण-उत्सव साजरे करण्याची राज्य सरकारकडून सक्ती केली जात आहे. त्यानुसार नेहमी धुमडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव देखील यंदा अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. गणेशोत्सव मिरवणुकांनाही प्रशासनाने ठिकठिकाणी बंदी घातलेली आहे. त्यातच मुस्लिम धर्मियांचा मोहरम हा सण येत आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे. 

मोहरम सणानिमित्त ताजिया ताबुतांच्या मिरवणुका काढण्यात येतात.  परंतु या मिरवडणुकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम आडवे येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयातही मिरवणुकांना परवानगी मागणारी याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने केवळ मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या गृह खात्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी इतर सणांसारखेच मोहरमही साध्या पद्धतीने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे मातम मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा- २ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा