Advertisement

यंदा दहीहंडीचा उत्सव रद्द - राम कदम

भाजपा नेते राम कदम यांनी आपला दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा दहीहंडीचा उत्सव रद्द - राम कदम
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या व्हायरसच्या पार्शभूमीवर सर्व सणांवर संकट आलं आहे. हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळं सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. अशातच आता दहीहंडी उत्सव जवळ आला आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीनं यंदा आयोजकांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहिहंडी उत्सवावेळी होणारी गर्दी लक्षात घेता भाजपा नेते राम कदम यांनी आपला दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटकोपर परिसरात राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. तसंच अनेक पथकं या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. परंतु यावेळी करोनाचं संकट पाहता राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

'करोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता, घाटकोपरमघ्ये होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे', असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गतवर्षी देखील राम कदम यांनी दहिहंडी उत्सव रद्द केला होता. पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळं सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर राम कदम यांनीदेखील दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहनही केलं होतं.



हेही  वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा