Advertisement

यंदाच्या दही हंडी उत्सवावर कोरोनाचं संकट

सध्या गोविंदा पथक आणि दहिहंडी समन्वय समिती वेट अॅण्ड वॉच भूमिकेमध्ये आहे.

यंदाच्या दही हंडी उत्सवावर कोरोनाचं संकट
SHARES

मुंबईसह राज्यभरताली कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या वाढत्या संख्येमुळं आगामी काळात येणाऱ्या उत्सवांवर मोठं संकट येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवात लोणी लुटायला मिळेल का? असा सवाल गोविंदा पथकांना पडला आहे. या उत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसं करणार, हा मोठा प्रश्न पथकांसोर आहे. राज्य सरकारच्या निर्णयाकडेही मंडळ, गोविंदा पथकांचे लक्ष आहे.

सध्या गोविंदा पथक आणि दहिहंडी समन्वय समिती वेट अॅण्ड वॉच भूमिकेमध्ये आहे. मागील सलग ३ वर्षे गोविंधा पथकांना न्यायालयाची पायरी चढावी लागली. तरीही दिलेल्या आदेशाप्रमाणे गोविंदांनी उत्साहात उत्सव साजरा केला. मात्र, यंदाचं कोरोना संकट हे अधिक आव्हानात्मक आहे. त्यामध्ये शारिरिक अंतर राखायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे.

दहीहंडी फोडताना थराथर रचले जातात. एका संघात किमान १०० हून अधिक गोविंदांचा समावेश असतो. नेहमी दहीहंडी उत्सवासाठी मे अखेरपासून मोठ्या पथकांचा सराव सुरू होतो. मात्र, यंदा सोशल डिस्टन्सिंगमुळं सरावाला अजून सुरूवात झाली नाही. दहीहंडी उत्सवाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे गोविंदा पथकांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली. तसेच आयोजकांचाही खर्च वाढला. उत्सवावासाठी स्पॉट विमा, गोविंदाचा विमा असणे आवश्यक आहे. तसेच गोविंदाच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी सेफ्टी उपकरण देणे बंधनकारक आहे.

या नियमांमुळं अनेक आयोजकांनी माघार घेतली. त्यामुळं बक्षीस रक्कम कमी झाली; मात्र स्पर्धा कायम राहिली. मागील वर्षापासून आर्थिक मंदीमुळे कॉर्पोरेट कंपन्यांनीही हात आखडता घेतला. टीशर्ट, वाहतूक खर्च भागवणं यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आता तर लॉकडाऊनमुळं अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळं या वर्षी उत्सवासाठी आवश्यक रसद मिळण्याची शक्यता कमी आहे.

दहिहंडी समन्वय समितीनं दहीहंडी उत्सवाबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. समिती सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. जून महिन्यात या सर्व परिस्थितीचा विचार करुन दहिहंडी उत्सवाबाबत पथकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे समितीकडून सांगण्यात आले. मागील आठवड्यापासून ठाणे, मुंबईच्या गोविंदा पथकांची ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू आहे. गोविंदा पथक उत्सव करण्यावर ठाम आहे. त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत अजून चित्र स्पष्ट होत नाही. त्यावरच विचार सुरू आहे. 



हेही वाचा -

बेस्टचा आंदोलनाचा इशारा, अत्यावश्यक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा