Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

गणेशोत्सव २०१९: मुंबईतील गणेश मंडळांना ‘सीपीआर’चं प्रशिक्षण


SHARE

गणेशोत्सव (ganesh ustav 2019) हा मुंबईतील सर्वांत मोठा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान मुंबईकर भाविक गणेशोत्सवाचे देखावे बघत फिरत असतात. अशा स्थितीत वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा गणेश मंडळातील स्वयंसेवकांना मुकाबला करता यावा म्हणून मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलने या स्वयंसेवकांना कार्डिओपल्मनरी रेसुसिटेशन (CPR) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) याचं नुकतंच प्रशिक्षण दिलं.  

या प्रशिक्षण शिबिरात लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्ली), काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ (महागणपती), चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंतामणी), फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ, तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आणि ताडदेव सार्वजनिक उत्सव मंडळ (ताडदेवचा महाराजा) अशा मुंबईतील ५० हून अधिक गणेश मंडळांतील २५० स्वयंसेवक या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले हाेते. यामुळे १० दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान  एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का (कार्डिअॅक अरेस्ट) आल्यास किंवा इतर काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तिचा सामना करण्यात मंडळांना मदत होणार आहे. 

यासंदर्भात मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले, “गणेशोत्सव हा मुंबईतील सर्वांत मोठा उत्सव आहे आणि देशभरातील तसंच परदेशातील लोक यात सहभागी होण्यासाठी येतात. या १० दिवसात मुंबईत प्रचंड धामधूम असते. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वाढते. वोक्हार्ड हॉस्पिटलने दिलेल्या प्रशिक्षणामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या काळात स्वयंसेवकांना रुग्णाचे प्राण वाचवण्यात मदत होईल.” 

या प्रशिक्षण शिबिराबद्दल लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली मंडळाचे सचिव स्वप्निल परब म्हणाले. “दरवर्षी लाखो भक्त लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या मंडळाला भेट देतात. काहीवेळा येणाऱ्यांपैकी कोणाला तरी वैद्यकीय मदतीची गरज निर्माण होते आणि परिस्थिती कठीण होऊन जाते. अशा संकटसमयी मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट हॉस्पिटलने दिलेलं प्रशिक्षण खूपच उपयोगी ठरू शकतं. आरोग्य हेच खरं धन आहे. भक्तांच्या सोयीसाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू.”हेही वाचा-

गोविंदा पथक साधेपणानं साजरा करणार दहीहंडी उत्सव

गणेशोत्सव २०१९: नोंदणी नाही तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्तसंबंधित विषय
संबंधित बातम्या