Advertisement

केईएमच्या डॉक्टरांचा ‘ट्री गणेशा’


केईएमच्या डॉक्टरांचा ‘ट्री गणेशा’
SHARES

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सृष्टीही सज्ज झाली असून केईएम रुग्णालयातील डॉक्टर, मार्ड संघटनेतील सदस्यांनी मिळून यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार डॉक्टरांनी कामाची वेळ सांभाळून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारत त्यात रोपाची लागवड केली आहे. या मूर्तीला त्यांनी 'ट्री गणेशा' असं नाव दिलं आहे.



यासंदर्भात माहिती देताना मार्डचे अध्यक्ष डॉ यशोवर्धन काब्रा म्हणाले की, गणेशोत्सवाला सुरूवात होण्याच्या २ दिवस अगोदर आम्ही मूर्ती बनवण्याचं काम हाती घेतो. मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक व्हावी म्हणून शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवतो.



मूर्ती साकारण्यासाठी माती १० दिवस भिजवून ठेवावी लागते. माती मऊ झाल्यावर तिच्यापासून मूर्ती उत्तम रितीने घडवता येते. पर्यावरण जनजागृतीसाठी गेल्यावर्षीपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. मार्ड आणि निवासी डॉक्टर मिळून हा गणपती साकारतो. यंदा १२ निवासी डॉक्टर आणि काही इंटर्न यांनी मिळून गणपती बनवला आहे. मुख्यमंत्र्यांना देखील आमची संकल्पना आवडली आहे.



पर्यावरणाची हानी होऊ न देता गणेशोत्सव साजरा करता येतो, हे दाखवून देणे यामागचा मुख्य उद्देश आहे. गणपतीची मूर्ती साकारण्यासाठी कुठल्याही कृत्रिम वस्तूचा वापर करण्यात येत नाही. गणेशोत्सवादरम्यान २९ तारखेला अवयवदान जागृती मोहीम आणि रक्तदानाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी या विषयांवर शिबीर ठेवणार आहोत.
- डॉ. राजेश कटरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना


हे देखील वाचा -

गौरी-गणपतीसाठी यंदा 'इमिटेशन'चा साज!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा