Advertisement

गौरी-गणपतीसाठी यंदा 'इमिटेशन'चा साज!


गौरी-गणपतीसाठी यंदा 'इमिटेशन'चा साज!
SHARES

गणपती आणि गौरींच्या आगमनाची सध्या सर्वत्रच जोरदार तयारी सुरू आहे. आपल्या घरी येणारा बाप्पा हा सर्वांपेक्षा वेगळा दिसावा, आपल्या बाप्पाला वेगळ्या दागिन्यांचा साज चढवावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सध्या सोन्याचे चढे भाव बघता, लोकांनी आपला मोर्चा दादरच्या स्ट्रीट शॉपिंगकडे वळवला आहे.




खरेदीसाठी दादर मार्केट फुल्ल!

यंदा गणपतीसाठी खास दागिने जरी बाजारात उपलब्ध नसले, तरी खरेदीसाठी दादर मार्केट फुल्ल आहे. सोन्या-चांदीच्या वाढत्या किंमती बघता, इमिटेशन ज्वेलरीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. इमिटेशन ज्वेलरीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.




इमिटेशन ज्वेलरीलाच पसंती

गणपतीसाठी कंठी, मोत्यांचा हार, मुकूट, बाजूबंद, जास्वंदीचा हार, सोंडपट्टी, बिकबाळी, दुर्वांचा हार अशा दागिन्यांना मागणी आहे. कारण इमिटेशन ज्वेलरी ही सोन्याच्या दागिन्यांसारखीच दिसते. त्यामुळे खरे आणि खोटे दागिने यातील फरक पटकन समजत नाही. इमिटेशन ज्वेलरीही वर्षानुवर्षे खराब होत नाही. त्यामुळे या वस्तू गिफ्ट देण्याकडेही ग्राहकांचा कल आहे.

ग्राहक सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरीला जास्त पसंती देतात. यावर्षीही गणपतीच्या दागिन्यांप्रमाणेच इतर वस्तूंचीही मागणी जास्त आहे. गणपतीसाठी उंदीर, मोदक, गदा, विड्याचे पान, सुपारी, ताम्हण अशा वस्तूंची मागणी यावर्षी वाढली आहे.

जगदीश सिंग, दुकानदार

अगदी 150 रुपयांपासून ते 2000 पर्यंत हे दागिने मिळतात. गणपतीच्या गळ्यातले हार, कंठी अगदी 250 ते 800 पर्यंत इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांची मागणी असेल त्या किंमतीचे आणि डिझाईनचे दागिने ग्राहकांना तयार करून मिळत आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनाही मागणी होती. पण यावर्षी 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी झाल्याचे दादरमधील सुवर्णस्पर्श ज्वेलर्सचे हरेश पटेल म्हणाले.




गौरीसाठीही इमिटेशन ज्वेलरीची मागणी

केवळ गणपतीसाठी नाही, तर गणपती पाठोपाठ येणाऱ्या गौरीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी इमिटेशन ज्वेलरीलाच मागणी आहे. अस्सल पारंपरिक दागिन्यांप्रमाणेच हे दागिने दिसतात. दागिन्यांच्या विविध प्रकारांनी सध्या दादरचे कीर्तीकर मार्केट भरून गेले आहे. अगदी 100 रुपयांपासून हे दागिने उपलब्ध आहेत. गौरीसाठी नथ, मंगळसूत्र, पोहे हार, लक्ष्मी हार, कोल्हापूरी साज, बांगड्या, तोडे, कंबरपट्टा, मोत्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.



गेल्या दोन वर्ष सोन्याचा भाव भरमसाठ वाढला आहे. त्यामुळे आता सोन्याचे दागिने सर्वसामान्य माणसाला खरेदी करणे शक्य राहिलेले नाही. त्यामुळे या इमिटेशन ज्वेलरीचा पर्याय निवडला. हे दागिने अगदी खरे वाटतात. त्याचप्रमाणे बजेटमध्ये असतात. हे दागिने आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो.
अर्चना जोशी, ग्राहक

सोन्याच्या वाढत्या भावाचा फायदा हा इमिटेशन ज्वेलरी विकणाऱ्यांना होत आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांची हौसही पूर्ण होते. त्यामुळे सोन्याचा भाव जरी वाढला, तरी इमिटेशन ज्वेलरी यावर्षी भाव खाऊन जात आहे, हे मात्र नक्की!



हेही वाचा - 

गणपतीसाठी तयार होत आहेत खास 'इको फ्रेंडली' मखर!

पर्यावरण संवर्धनाचा 'ट्री गणेशा'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा