Advertisement

दिवाळीनिमित्त सुकामेवाच्या किंमतीत वाढ


दिवाळीनिमित्त सुकामेवाच्या किंमतीत वाढ
SHARES

दरवर्षीप्रमाणं यंदाही दिवाळीनिमित्त सुकामेवाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिवाळीत मिठाईऐवजी सुकामेव्याला मोठी मागणी असते. त्यानुसार यंदाही सुकामेवाच्या मागणीत जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान,  पाकिस्तानकडून आयात होणारी खारीक बंद झाल्यानं खारकेचं दर वधारले असून, त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या सुकामेव्यावर झाला आहे.

यंदा वर्षाच्या सुरुवातीला खारकेचा घाऊक दर १२० रुपये असून, किरकोळ दर १८० रुपये किलोच्या आसपास होता. भारतात उपलब्ध असलेली ८० टक्के खारीक पाकिस्तानहून येते. मात्र, ती आयात आता बंद झाल्यानं खारकेच्या किमती वाढ झाली आहे. तसंच, ऐन दिवाळीत ४०० रुपये किलोच्या घरात गेल्या आहेत.


सुकामेव्याचे दर

सुकामेवा
आधीचे दर
सध्याचे दर
खारीक
१८०-२००
३८०-४२०
अक्रोड अख्खे
५००-७००
७००-८००
अक्रोड तुकडा
८००-९००
११००-१२००
काजू
७००-८०० 
९००-१०००
बदाम
७००-९०० 
१०००-१२००
बेदाणे
३००-३२० 
४००-४४०



हेही वाचा -

Ind Vs SA: अखेरच्या कसोटी सामन्यात धोनी लावणार हजेरी

'पीएमसी'बाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा