Advertisement

मुंबईत समुद्रकिनारे, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी नाही

पालिकेनंही यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईत समुद्रकिनारे, तलावांमध्ये छठ पूजेला परवानगी नाही
SHARES

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छठ पूजेला (छठ पूजा) बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत छठ पूजा तलावांमध्ये आणि काठावर केली जाणार नाही. पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. पालिकेनंही यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

१८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या काळात छठ उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी मुंबईत सार्वजनिक जलाशयांमध्ये हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय एक दिवस आधी घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे पूजेसाठी खुली झाली आहेत.

फक्त मुंबईच नाही तर झारखंडनंही हा निर्णय घेतला होता. झारखंड सरकारनं सार्वजनिक जलाशयांच्या आसपास छठ पूजेवर बंदी घातली होती. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला. झारखंड सरकारच्या या निर्णयाला भाजपानं विरोध केला. यानंतर सीएम हेमंत सोरेन स्वत: पुढे आले आणि म्हणाले की, बंदी हटविली जात आहे. परंतु जलाशयांमध्ये पूजा करण्यासाठी सर्व नियम पाळावे लागतील.



हेही वाचा

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक

पर्यावरणपूरक शेणाचे दिवे 'असे' बनतात, जाणून घ्या त्याचे फायदे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा