Advertisement

बाप्पांच्या आगमनावेळी तरूणांकडून धुडगूस; लालबाग उड्डाणपुलाखाली तोडफोड

बाप्पाच्या अागमनावेळी लालबाग उड्डाणपूलाखालील डिव्हायडरवरील तयार करण्यात आलेल्या कलाकृतीचं तरुणांनी नुकसान केलं आहे. तसंच जाळी तोडून डिव्हायडरमधील झाडंही पायाखाली तुडवली.

बाप्पांच्या आगमनावेळी तरूणांकडून धुडगूस; लालबाग उड्डाणपुलाखाली तोडफोड
SHARES

गणेशोत्सवाला आता फक्त ४ दिवस शिल्लक राहिले असून मुंबईत सार्वजनिक गणपती बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. मात्र, या आगमन सोहळ्याला अतिउत्साही गणेशभक्तांमुळं गालबोट लागलं आहे. बाप्पाच्या अागमनावेळी लालबाग उड्डाणपूलाखालील डिव्हायडरवरील तयार करण्यात आलेल्या कलाकृतीचं तरुणांनी नुकसान केलं आहे. तसंच जाळी तोडून डिव्हायडरमधील झाडंही पायाखाली तुडवली. 



मानवंदना पुतळ्याची तोडफोड 

मुंबईत शनिवारी दुपारी अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झालं. त्यावेळी लाखो गणेशभक्तांनी लालबाग-परळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोठ्या गणपती मुर्तींचे कारखाने लालबाग आणि परळ परिसरात असल्यामुळं आगमनावेळी बाप्पांचे फोटो काढण्यासाठी काही जण लालबाग उड्डाणपूलाखालील डिव्हायडरवर उभे राहिले होते. त्यावेळी अतिउत्साहात असलेल्या तरुणांनी डिव्हायडरवरील महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना करण्यासाठी उभारण्यात आलेला पोलिस गणवेशातल्या पुतळ्याची तोडफोड केली. तसंच येथील अाकर्षक कलाकृतीही तोडली.      


बसच्या टपावर नाच

 अनेक जण लालबाग उड्डाणपुलाखाली नाचत होते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. तसंच, काहीजण बसच्या टपावर आणि खासगी गाड्यांच्या टपावर उभे राहून नाचत होते. दरवर्षी लालबाग-परळ परिसरात गणपती बाप्पांच्या आगमनावेळी बाप्पांचे फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.  ही गर्दी इतकी होते की चेंगराचेगरीची घटना होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणं ढोल पथक आणि बॅन्जोच्या आवाजामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, ज्या तरुणांनी अतिउत्साहात येऊन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

धोतर, उपर्णेतल्या बाप्पाचा ट्रेंड

गणेशोत्सवात ४५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा