Advertisement

भायखळा, बकरी अड्डा परिसरात भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय


भायखळा, बकरी अड्डा परिसरात भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय
SHARES

मुंबईत मंगळवारी सकाळपासून घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात राजांच्या मिरवणुकीचा जल्लोष दिसत आहे.

यानिमित्ताने भाविकांसाठी विविध ठिकाणी मोफत पाणी वाटप केले जात आहे. त्याचप्रमाणे भायखळ्यातील बकरी अड्डा परिसरात मोफत आरोग्य व्यवस्थेसह खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

बकरीअड्डा या परिसरातून लालबागचा राजा, तेजुकाया आणि मुंबईतील इतर महत्त्वाचे गणपती विसर्जनासाठी जातात. त्यामुळे मैत्री फाऊंडेशनने पुढाकार घेत भक्तांसाठी व्यवस्था केली आहे. याच सोबत सामाजिक संदेश देणारे फलक देखील लावण्यात आले आहेत.


भाविकांसाठी या मोफत व्यवस्था

  • मोफत अॅम्ब्युलन्स सेवा
  • पिण्याच्या पाण्याची सोय
  • पोहे आणि फळांची व्यवस्था

गेल्या 10 वर्षांप्रमाणे मैत्री फाऊंडेशनने यंदाही भक्तांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.

दरवर्षी 10 ते 11 किलो पोह्यांचे वाटप केले जाते. विशेष म्हणजे हवाबाई चाळीतले रहिवासी मदत करतात. तरुणांपासून लहानगेही हातभार लावतात.
- शिवशंकर गुप्ता, अध्यक्ष, हवाभाई चाळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा