Advertisement

पाणीपुरीच्या पुरीतून साकारला ९ फूटांचा बाप्पा

वेगवेगळ्या रूपात साकारलेला बाप्पा आपण अनेकदा पाहिला असेल. मुंबईतल्या अनेक गणपती मंडळांनी वेगवेगळ्या रूपातला बाप्पा साकारला आहे. पण मालाडच्या एका मंडळानं साकारला आहे पाणीपुरी बाप्पा...

पाणीपुरीच्या पुरीतून साकारला ९ फूटांचा बाप्पा
SHARES

आत्तापर्यंत तुम्ही अनेक गणपती पाहिले असतील. मेंटॉसच्या गोळ्या, कडधान्यं, साबूदाणे, लाकूड या साहित्यांचा वापर करून आत्तापर्यंत अनेक गणपती साकारण्यात अाले आहेत. पण मालाडमधील या गणपतीची बातच वेगळी आहे. कारण हा गणपती बनलाय पाणीपुरी बनवायच्या साहित्यापासून... पाणीपुरीपासून गणपतीबाप्पा तयार केला जाऊ शकतो, अशी तुम्ही कधी कल्पना केली होती का? वाचून काहीसं आश्चर्य वाटंल ना. पण हे खरं आहे. मालाडमधल्या एका मंडळाला ही अनोखी कल्पना सुचली आहे


बाप्पाची रूपं अनेक

मालाड पश्चिम इथल्या श्याम निर्मल मित्र मंडळानं ही हटके संकल्पना राबवली. अशाप्रकारचा गणपती काही वर्षांपूर्वी पुण्यात बनवण्यात आला होता. पण मुंबईत पहिल्यांदाच पाणीपुरीचा बाप्पा साकारण्यात आला अाहे. या मंडळानं ९ फूट बाप्पाची मूर्ती साकारली आहे.


३५०० पाणीपुरीचा वापर

चमचमीत अशा पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पुऱ्यांचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे. फक्त पुऱ्याच नाही तर यात आणखी साहित्यही आहे. गणपती साकारण्यासाठी ३५०० पाणीपुरी, ९ किलो मूगडाळ, .५ किलो मटार, .५ किलो खजूर, २ किलो चणे, .५ किलो बटाटे, १ किलो चिंच, १ किलो बुंदी, अर्धा किलो मिरची आणि पुदिना या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. यासोबत गणपतीच्या प्रतिमेतून पाणी निघताना देखील दाखवण्यात आले आहे


आकर्षणाचा केंद्रबिंदू

पाणीपुरीचा बाप्पा बनवण्यासाठी मंडळानं प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या हटके संकल्पनेमुळे हा बाप्पा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. पाणीपुरीच्या साहित्यापासून साकारलेला बाप्पा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. हटके गणपती बनवण्यासाठी हे मंडळ ओळखलं जातं. यापूर्वी त्यांनी जिलेबी-फापडापासून देखील गणपतीची मूर्ती साकारली होती. 


तुम्हाला देखील पाणीपुरीपासून साकारलेला बाप्पा पाहायचा असेल तर मालाड इथल्या एन. एल. हायस्कूलच्या समोर नर्सिंग लेनला भेट देऊ शकता. 


हेही वाचा

९५ वर्षे चलचित्र सादर करणारा 'वांद्र्याचा राजा'

लाकडात साकारला साई दर्शन मित्र मंडळाचा बाप्पा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा