Advertisement

जीएसटीमुक्त गणेशमूर्ती महागच

केंद्र सरकारनं गणेशमूर्तींवरील जीएसटी रद्द केला असला तरी गणेशमूर्तींची किंमत कमी होणार नाही, असं मत मूर्तीकारांनी व्यक्त केलं आहे.

जीएसटीमुक्त गणेशमूर्ती महागच
SHARES

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपल्याने मुंबईसह राज्यभरातील गणेश मंडळांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच, अर्थमंत्री पियूष गोयल यांनी गणेशमूर्तींवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) काढून टाकण्याची घोषणा केली. त्यामुळे मंडळांच्या आनंदात भरच पडली. परंतु हा आनंद काहीक्षणांपुरताच ठरला, असं म्हणता येईल. कारण मूर्तीकारांनी गोयल यांच्या घोषणेआधीच मूर्ती घडवण्यासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी केल्याने, या दरांनुसारच गणेशमूर्तींच विक्री करण्यात येणार आहे. यामुळे गणेशमूर्ती स्वस्त किंमतीत मिळतील अशी अपेक्षा असेल, तर भ्रमनिरास होण्याचीच अधिक शक्यता आहे.   


जीएसटी लागू असताना खरेदी

गणेशोत्सवाच्या २ महिनेअगोदरच मुंबईतील सर्व गणेश कार्यशाळांमध्ये मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात होते. बाप्पांची मूर्ती तयार करण्यासाठी अनेकविध साहित्यांची गरज असते. त्यात प्लास्टर आॅफ पॅरिस, रंग, लाकूड, लोखंडी रॉड आणि सजावटीच्या इतर वस्तूंचा समावेश असतो. या सर्वच वस्तूंची खरेदी जीएसटी लागू असताना करण्यात आल्याने गणेशमूर्तींची किंमत कमी होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील गणेश कार्यशाळांमध्ये ७ फुटांपासून २२ फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनवण्यात येतात. या मूर्तींची किंमत २५ हजार रुपयांपासून लाखांपर्यंत असते. आम्ही पीओपी, रंग, लाकूड, लोखंडी रॉड आणि इतर वस्तूंची खरेदी जीएसटी लागू असताना केल्यामुळं यंदा बाप्पाच्या मूर्तींची किंमत कमी करणं शक्य नाही. त्यामुळे सरकारनं हा निर्णय या वर्षाकरीता न ठेवता पुढेही कायम ठेवावा.
- राजू शिंदे, मूर्तीकारसरकारनं हा निर्णय २ ते ३ महिने अगोदर घेणं गरजेचं होतं. मात्र, हा निर्णय गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना घेतल्यामुळं मूर्तींची किंमत कमी होणं शक्य नाही. मात्र, पुढच्या वर्षी या निर्णयाचा गणेश मंडळांना फायदा होऊ शकतो.
- राहुल घोणे, मूर्तीकारहेही वाचा -

करा, बँक आॅफ इंडियात नोकरीसाठी अर्ज, बघा किती आहेत जागा!

मेडिकल प्रवेशासाठी ‘डोमिसाइल’च्या अटी योग्यच - सर्वोच्च न्यायालय
 

संबंधित विषय
Advertisement