Advertisement

गणेशोत्सवात राजकीय दिलजमाई, राज यांनी घेतलं शेलारांच्या मंडळातील गणपतीचं दर्शन, तर उद्धव ठाकरे कृपाशंकर सिंह यांच्या घरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळातील गणपतीचं दर्शन घेतलं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरात विराजमान गणपतीचं दर्शन घेतलं.

गणेशोत्सवात राजकीय दिलजमाई, राज यांनी घेतलं शेलारांच्या मंडळातील गणपतीचं दर्शन, तर उद्धव ठाकरे कृपाशंकर सिंह यांच्या घरी
SHARES

सर्व राजकीय मतभेद विसरून राजकारणी गणेशोत्सवात गणपती बाप्पांचं दर्शन घेताना दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळातील गणपतीचं दर्शन घेतलं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरात विराजमान गणपतीचं दर्शन घेतलं.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंनी भाजपाविरोधात चांगलीच आघाडी उघडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरील टिकेला उत्तर देण्यासाठी भाजपाकडून आशिष शेलार आखाड्यात उतरले होते. यादरम्यान दोघांमधील शाब्दीक युद्ध चांगलंच रंगलं होतं. परंतु गणेशोत्सवाच्या माहोलात शेलार यांच्याकडून निमंत्रण आल्यावर मतभेद विसरून राज ठाकरे यांनी शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचं दर्शन घेतलं.

तर, उद्धव ठाकरे यांनी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी सपत्नीक जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचले. सलग दुसऱ्या वर्षी फडणवीस यांनी सिंह यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. सिंह काँग्रेसमधून भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.



हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: बघा, रितेशने ‘असा’ बनवला इको फ्रेंडली बाप्पा!

बाप्पाला निरोप देताय? भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा