Advertisement

गणेशोत्सव २०१९ : 'कलम ३७०'वर भाष्य करणारा 'शिवडीचा राजा'

मुंबईमधून सामाजिक देखावे लोप पावत चालले आहेत. असं असताना या मंडळानं मात्र सामाजिक कार्याचं भान राखत देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी या मंडळानं 'नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट' हा वास्तवदर्शी देखावा साकारला आहे.

गणेशोत्सव २०१९ : 'कलम ३७०'वर भाष्य करणारा 'शिवडीचा राजा'
SHARES

शिवडीचा राजा हा सामाजिक देखाव्याचा राजा म्हणूनही प्रसिद्ध आहे. सामाजिक देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा वसाच मंडळानं उचलला आहे. आज मुंबईमधून सामाजिक देखावे लोप पावत चालले आहेत. असं असताना या मंडळानं मात्र सामाजिक कार्याचं भान राखत देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी या मंडळानं 'नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट' हा वास्तवदर्शी देखावा साकारला आहे


काश्मीर मुद्द्यावर देखावा

जगाच्या पाठिवर सर्वात प्राचिन संस्कृतीपैकी एक भारत आणि त्याचा मुकुटमणी काश्मीर... १९४७ पासून काश्मीर स्वर्ग रक्ताळलेला राहिला. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर हा कळीचा मुद्दा बनला. त्यात कलम ३७०ची गाठ बसलेली होती. गेले काही दिवस कलम ३७० या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. याच कलमाचा मागोवा घेत मंडळानं नंदनवनात स्वातंत्र्यांची पहाट हा वास्तवदर्शी देखावा सादर केला


३७० कलमाला विरोध

देखाव्यात काश्मीरची परिस्थिती मांडण्यात आली आहे. सदर देखावा ८ मिनिटांचा असून भारत सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे देखील स्वागत मंडळानं देखाव्याच्या माध्यमातून केलं आहे. जर तुम्हाला देखील हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर शिवडीच्या राजाला प्रत्यक्ष भेट देऊ शकता.  


सामाजिक कार्यात हातभार

शिवडी मध्यविभाग सार्वजनिक मंडळाचे हे ६८ वे वर्ष आहे. गेली ६ दशके सातत्यानं मंडळ सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा महोत्सव आणि आपत्कालिन मदत यासारखे उपक्रम राबवत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत नुकत्याच आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबियांवर संकटाचे डोंगर कोसळले. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शिवडीच्या राजा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. सांगली इथल्या मसुचीवाडी गावाला भेट देऊन इथल्या पूरग्रस्तांना शालेय आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंहेही वाचा

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीचा चिंतामणी

गणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या

 

संबंधित विषय
Advertisement