Advertisement

Ganpati visarjan 2020 यंदा शांततेत गणरायाला लाखो भाविक देणार निरोप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

Ganpati visarjan 2020 यंदा शांततेत गणरायाला लाखो भाविक देणार निरोप
SHARES

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती व सार्वजनिक बाप्पाला वाजत-गाजत निरोप दिला जातो. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत, तासन्तास चालणाऱ्या मिरवणुका, ठिकठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, हे चित्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी असतं. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांततेत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनावेळी होणारी गर्दी यंदा नाहिशी झाली आहे. सर्वत्र शांततेचं वातावरण असून विसर्जनाठिकाणी पोलिसांचा फौजफाटा ही वाढविण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्याने गुलालाचीही मागणी घटली. एरव्ही २०० ते ४०० किलो गुलाल सहज विकणारे विक्रेते यंदा किलोभर गुलाल विकण्यासाठीही ग्राहक शोधत आहेत. साधारण मंडळांमध्ये ५० ते १०० किलो तर मोठ्या मंडळांमध्ये २०० ते ५०० किलोपर्यंत गुलालाची उधळण होते. यंदा शेकडो टन गुलाल विक्रीवाचून पडला आहे. परिणामी गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल करणारी गुलालाची बाजारपेठ यंदा बेरंग झाली आहे.

मुंबईच्या लालबाग परिसरात प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या राजाची म्हणजे गणेश गल्लीच्या बाप्पाची मिरवणूक सकाळी लवकर सुरू होते. लाखो लोकांच्या जनसमुदायात ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्ती गिरगाव चौपाटीकडं प्रस्थान करतं. परंतु, यंदा मंडपाच्या आवारातच विसर्जन होणार आहे. उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खेतवाडीत आदल्या दिवशीच विसर्जनाची लगबग सुरू होते. मूर्ती उंच असल्यानं मंडप सोडणं, रस्ते मोकळे करणं अशी बरीच कामं कार्यकर्त्यांपुढे असतात.

एकामागोमाग एक बाराही गल्ल्यांचे गणपती विसर्जनाला निघतात. त्यामुळं पहाटे ५ वाजताच ढोल-ताशे दणाणू लागतात. यंदा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चौपाटी गाठणार आहेत. विसर्जनासाठी पोलिसांनी आखून दिलेल्या वेळेनुसार विसर्जन करण्यात येणार आहे. पुष्पवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रॉफ बिल्डिंगमधील पुष्पवृष्टी यंदा रद्द करण्यात आली. गेली पन्नास वर्षे ही पुष्पवृष्टी न चुकता होत आली आहे.

लालबाग जंक्शन परिसरातून गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणाऱ्या सुमारे ४०० ते ४५० मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येते. सकाळी ११ पासून रात्री १ ते १.३० वाजेपर्यंत पुष्पवृष्टी सुरू असते. कोरोनामुळं सर्वच मिरवणुका रद्द करण्यात आल्याने पुष्पवृष्टी न करण्याचा निर्णय घेतला. 



हेही वाचा -

गणेशभक्त १० दिवसांच्या बाप्पाला देणार निरोप

मुंबईत विसर्जनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा