Advertisement

कोरोनामुळं बाप्पाचं आगमन साधेपणानं

यंदा कसलाच उत्साह नाही. कोरोनामुळं सगळं ठप्प झालं आहे.

कोरोनामुळं बाप्पाचं आगमन साधेपणानं
SHARES

दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत बाप्पाचं आगमन होतं. आगमनात पारंपारीक वाद्यांच्या तालावर गणेशभक्त थिरकतात. तसंच, परिसरात होणारी गर्दीमुळं वाहतूक पोलिसांना ही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. परंतु, यंदा कसलाच उत्साह नाही. कोरोनामुळं सगळं ठप्प झालं आहे. यंदाच्या गणेशोत्सावर कोरोनाचं सावट असल्यानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा आवाहन नागरिकांना केलं आहे.

गणपतीच्या आगमनासाठी आता मुंबापुरी सज्ज झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात, ठाणे, नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं साधेपणाने श्री गणेशाचे आगमन होत आहे. कोरोनामुळे सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत दरवर्षी उत्सवावर  लाखो कोटयवधी खर्च केले जातात. गणेशोत्सव तर मुंबईचा जीव की प्राण. मात्र, यंदाच्या गणेशोत्सावर कोरोनाचे संकट आहे.

कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर पळविण्यासाठी प्रत्येज जण सज्ज झाला आहे. कोरोनामुळं मुंबईकरांनी गणेशोत्सवऐवजी आरोग्यासह पर्यावरणोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली असून, सायंकाळ, रात्रीसह शनिवारीदेखील पावसाचा हा जोर मुंबईत कायम राहणार आहे.

कोरोनाचे सावट असले तरी देखील मुंबई, ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीकरिता मुंबईतल्या स्थानिक आणि लालबाग, दादरसारख्या बाजारांत सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती.



हेही वाचा -

कोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...

Ganesh Festival 2020: 'गणपतीसाठी कोकणात जाण्यावर घातलेले निर्बंध योग्यच'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा