Advertisement

Raksha Bandhan 2020 : राख्यांचा भरला ऑनलाईन बाजार, 'इथून' मिळणार राख्या घरपोच

Raksha Bandhan 2020 राखी उत्सवावर यावर्षी कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे ऑनलाईन राख्यांना डिमांड आहे. आम्ही तुम्हाला ५ साईट्स देत आहोत. इथून तुम्ही राखी ऑर्डर करा आणि ४ ते ५ तासात तुम्हाला राखी घरपोच केली जाईल.

Raksha Bandhan 2020 : राख्यांचा भरला ऑनलाईन बाजार, 'इथून' मिळणार राख्या घरपोच
SHARES

Raksha Bandhan 2020 राखी उत्सवावर यावर्षी कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे दरवर्षी राखीसाठी भरणारे बाजारांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पण टेंशन नॉट... ऑनलाईन बाजार आहे ना! व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल साइट्सच्या मदतीनं दुकानदारांनी ऑनलाईन राखी बुकिंग सुरू केली आहे. ऑर्डरच्या एक ते दोन तासांतच घरात राखीची डिलिव्हरी देखील केली जात आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही साईट्सची नावं सांगणार आहोत. जिथून तुम्ही ऑनलाईन राखी बुक करू शकता ती देखील तुमच्या आवडीची. २४ तासाच्या आता अगदी २-३ तासात देखील राखी तुमच्या घरी पोडोचवली जाईल.


१) igp.com

तुम्हाला त्वरीत राखी हवी असेल तर तुम्ही igp.com ला भेट देऊ शकता. यात तुम्हाला राखीसोबत एखादं गिफ्ट जसं की, चॉकलेट्स, वॉच किंवा आणखी काही भाऊरायाला पाठवायचं असेल तर त्याची देखील व्यवस्था आहे. तुम्हाला पाहिजे तसं पॅकेज निवडायचं, ऑनलाईन पैसे द्यायचे. २४ तासाच्या Express Delivery च्या मदतीनं आता राखी तुमच्या घरात पोहोचवली जाईल.

इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या, खी हँपर्स, राखी सेट्स, आदी पर्याय देखील उपलब्ध आहेत. राखी बनवण्यापासून ते एखाद्या स्थळी पोहोचवण्यापर्यंत सर्व नियमांचं पालन केलं जातं. सॅनिटाईज करणं, सेफ हँडल करणं, योग्य पॅकेजिंग असी काळजी घेतली जाते.    

नाव : igp.com

इथं भेट द्या : https://www.igp.com/

किंमत : ४२५ रुपयांपासून सुरुवात


२) Rakhi.in

Rakhi.in या वेबसाईटवर तुम्हाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ही साईट विशेष करून राखीसाठीच आहे. यात तुम्हाला राखीसोबत गिफ्ट्स देखील देता येतील. चॉकलेट, मिठाई, ग्रिटिंग कार्ड या सर्व वस्तू देखील उपलब्ध आहेत.  Express delivery च्या मदतीनं तुम्ही या राख्या आपल्या भावांना पाठवू शकता.

नाव : Rakhi.in

इथं भेट द्या : https://www.rakhi.in/send-rakhi-to-mumbai.html

किंमत : ५२९ रुपयांपासून सुरुवात


हेही वाचा : कंन्टेंमेंट झोनमध्ये राहणाऱ्या भावाला देखील राखी पोहोचणार, पोस्टाचा पुढाकार


३) Rakhi Bazar

आपल्या भावासाठी ऑनलाईन राखी पाठवून त्यांना चांगलंच सरप्राईज द्या. राखी बाजारवर पारंपरिक राखी, डायमंड राखी आणि शुद्ध चंदन राख्या अशा वेगवेगळ्या राख्या तुमच्या आवडीवनुसार खरेदी करू शकता. यासोबत राखी हँपर्स आहेत. ज्यात मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, केक असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

नाव : Rakhi Bazar

इथं भेट द्या : https://www.rakhibazaar.com/rakhi-to-mumbai-27.html

किंमत : ५७९ रुपयांपासून सुरुवात


४) myflowertree

रक्षाबंधन हा प्राचीन उत्सवांपैकी एक... फार पूर्वीपासूनच तो साजरा केला जातो. हा शुभ सण सकारात्मकरीत्या साजरा करण्यासाठी काही मनोरंजक आणि पारंपारिक विधी केल्या जातात. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाइतकं चांगले आणि शुद्ध असं काहीही नाही. मग या शुभदिवशी भेटवस्तूंकडे दुर्लक्ष कसं करता येईल? नाही का?

मग तुमच्यासाठी myflowertree राख्यांसोबतच गिफ्ट हँपर्स देखील घेऊन आले आहेत. त्यांच्या साईटवर तुमच्या आवडिची एखादी राखी निवडायची किंवा राखीसोबतच दिलेलं हँपर पॅक देखील निवडू शकता. वेगवेगळ्या फुलांपासून मिठाईपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे.

नाव : myflowertree

साईट : https://www.myflowertree.com/rakhi/same-day-delivery?sort=p.price&order=ASC&type=Low

किंमत : ३९९ पासून सुरुवात


५) winni

Winni या साईटवर देखील तुम्हाला २४ तासात राखी घरपोच केली जाईल. यासोबतच ग्रिटिंग कार्ड, केक, मिठाई असे गिफ्ट हँपर्स देखील भावासाठी पाठवता येतील.

नाव : winni

इथं भेट द्या : https://www.winni.in/send-rakhi/express-delivery?sort=priceLowHigh&showMain=&minPrice=&maxPrice=

किंत : २९९ रुपयांपासून सुरू



हेही वाचा

घरगुती गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली, लक्षात ठेवा हे १० नियम

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा