Advertisement

'मसूद अजहर' आणि 'पब्जी' गेमवर सजली वरळी बीडीडी चाळीत अनोखी होळी

'पब्जी' गेम पासून तरुणाई सावध व्हावी, यासाठी वरळीतील बीडीडी चाळ क्र. ७६ व ७७ येथे होळीनिमित्त श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने 'पब्जी'चा पुतळा उभारून होळी सजवली आहे.

'मसूद अजहर' आणि 'पब्जी' गेमवर सजली वरळी बीडीडी चाळीत अनोखी होळी
SHARES

मुंबईसह राज्यभरात ऑनलाईन 'पब्जी' या गेमने सर्व तरुणाईला वेड लावलं आहे. या गेमच्या आहारी जाऊन काहीजण आत्महत्या तर काहींना गेम खेळण्यात दंग झाल्याने रेल्वेने चिरडले. त्यामुळं या 'पब्जी' गेमपासून तरुणाई सावध व्हावी, यासाठी वरळीतील बी.डी.डी. चाळ क्र. ७६ व ७७ येथे होळीनिमित्त श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने 'पब्जी'चा पुतळा उभारून होळी सजवली आहे. तर, बी.डी.डी चाळ क्र. ७८ व ७९ मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांनी 'मसूद अजहर' याची होळी उभारली आहे.


'पबजी'ची होळी

वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ७६ व ७७ येथे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने 'पब्जी' गेमवर आधारीत होळी उभारली आहे. या होळीची उंची ५१ फूट असून ही भारतातील सर्वात उंच होळी मानली जाते. तसंच, 'पब्जी द सर्जिकल स्ट्राईक' असं लिहिण्यात आलं आहे. त्याचप्रमाणं पब्जी खेळामुळे झालेले अपघात यातून निदर्शनास आणले आहेत. 


'पब्जी' चे दुष्परिणाम


  • हिगोंलीमध्ये पब्जी गेम खेळण्यात दंग असलेल्या दोन जणांना चिरडले.
  • कुर्ला नेहरू नगरमध्ये पब्जी खेळण्यासाठी महागडा मोबाइल न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
  • मध्य प्रदेशमध्ये एका तरुण पब्जी खेळता-खेळता पाणी समजून अॅसिड प्यायला.
  • पब्जी खेळायच्या नादापायी एका तरुणाने आपली नोकरी गमावली.
  • पब्जी या गेममुळे अनेक तरुणांनी आपली मानसिक स्थिती हरवली.


'मसूद अजहर'ची होळी

वरळी येथील बी.डी.डी चाळ क्र. ७८ व ७९ मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांनी यंदा होळीनिमित्ताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची होळी उभारली आहे. 
कोळीवाड्यातील होळी

दरवर्षी मुंबईसह राज्यभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र मुंबईत्या वरळी आणि माहिम कोळीवाड्यात होळीच महत्व काही औरच आहे. या कोळीवाड्यांमध्ये होळीच्या दोन दिवस आधीपासून होळी साजरी केली जाते. तसंच, उंचच-उंच होळी उभारून येथील सर्व कोळीबांधव होळीची पुजा करतात. वरळी आणि माहिम कोळीवाडा येथील होळी पाहण्याजोगी असून या दिवशी मोठ्या जल्लोषात लोक होळीचा आनंद साजरा करण्यासाठी येथे गर्दी करतात. हेही वाचा -

राजीनामा दिलाच नाही; विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण

आगे आगे देखो होता है क्या; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सूचक विधानRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा