Advertisement

फिल्मी रुपात अवतरले बाप्पा, पुष्पा तर कुठे गणरायाचा बाहुबली लुक व्हायरल

कुठे बाप्पा पुष्पाच्या लूकमध्ये बसलेले दिसले तर कुठे आरआरआरचा राम चरण लूक चर्चेत आहे.

फिल्मी रुपात अवतरले बाप्पा, पुष्पा तर कुठे गणरायाचा बाहुबली लुक व्हायरल
SHARES

यंदा गणेशमूर्तींना फिल्मी टच पाहायला मिळाला आहे. कुठे बाप्पा पुष्पाच्या लूकमध्ये बसलेले दिसले तर कुठे आरआरआरचा राम चरण लूक चर्चेत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशभरात अशा अनेक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, ज्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांपासून प्रेरित आहेत.

'पुष्पा द राइज'पासून अल्लू अर्जुनची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. प्रेक्षकांची क्रेझ पाहून यंदा पुष्पा थीमवर बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीमध्ये बाप्पा पुष्पा स्टाईलमध्ये बसलेले दिसतात. ही गणपतीची मूर्ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.

RRR हा या वर्षातील सर्वात दमदार चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील रामचरणचा राम लूक खूप चर्चेत होता. या सीनने प्रेरित होऊन कारागिरांनी या थीमवर बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. सोशल मीडियावर ही मूर्ती खूप चर्चेत आहे.

बाजीराव-मस्तानीमध्ये पेशवा बाजीरावांची भूमिका अभिनेता रणवीर सिंहने साकारली होती. लोकांना त्याचे पात्र इतके आवडले की त्याच्या लूकने प्रेरित होऊन कारागिरांनी गणपती बाप्पाची मूर्ती बनवली. बाजीरावांच्या लूकमध्ये ही गणेशाची मूर्ती अतिशय रॉयल दिसते.


हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप इम्प्रेस केले होते. या लूकने प्रभावित होऊन एका गणेशभक्तानं क्रिश थीमची मूर्ती त्यांच्या घरी आणली. बाप्पाचा सुपरहिरो अवतार बच्चे मंडळीत लोकप्रिय झाला.


'बाहुबली द बिगिनिंग'मध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये प्रभासने खांद्यावर शिवलिंग घेतले आहे. हा सीन चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्यावर्षीपासून गणेशजींच्या अनेक मूर्ती या सीनवरुन प्रेरित होऊन बनवण्यात आल्या होत्या.



हेही वाचा

गणेशभक्तांसाठी खूशखबर! यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद

Mumbaicha Raja Ganpati: 'मुंबईचा राजा' काशी विश्वनाथ मंदिरात विराजमान

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा