Advertisement

जय जवानची ९ थरांची सलामी अन् मुख्यमंत्र्यांची लाइव्ह काॅमेंट्री


जय जवानची ९ थरांची सलामी अन् मुख्यमंत्र्यांची लाइव्ह काॅमेंट्री
SHARES

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. रस्त्यारस्त्यावर गोविंदा पथकं दिसतं असून थरावर थर रचले जात आहेत. एकूणच मुंबईसह ठाण्याचा परिसर दहीहंडीच्या उत्साहात न्हाऊन गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपवाद ठरलेले नाहीत. ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला हजेरी लावत मुख्यमंत्रीही दहीहंडी उत्सावाच्या रंगात रंगून गेले होते. एकीकडे जय जवान गोविंदा पथक थर लावत असताना दुसरीकडे व्यासपीठावरील सूत्रसंचालनाचं सूत्र आपल्या हातात घेत मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना प्रोत्साहीत केलं.


कुठली दहीहंडी?

स्वामी प्रतिष्ठानकडून पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. ठाण्यात प्रतिष्ठाननं मोठी हंडी लावली असून ही हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाखांचं लोणी चाखता येणार आहे. या २५ लाखांच्या दहीहंडीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. स्वामी प्रतिष्ठाननं मोठी हंडी लावतानाच सामाजिक भान जपत केरळ पूरग्रस्तांना ५ लाख रुपयांची, तर आत्महत्याग्रस्त शोतकऱ्यांच्या मुलांना २ लाखांची मदत दिली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला.



मुख्यमंत्र्यांनी वाढवला उत्साह

पहिल्यांदाच होत असलेल्या या दहीहंडीला हजेरी लावत मुख्यमंत्र्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत गोविंदांसह उपस्थितांचा उत्साह वाढवला, दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. तर ''थरावर थर लावत तुम्ही हंडी फोडा, आम्ही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन भ्रष्टाचाराची अत्याचाराची दहीहंडी फोडू'', असं सांगतं दहीहंडीच्या व्यासपीठावरही विरोधकांना फोडण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही.



९ थरांचा थरार

एकीकडं जय जवानचे गोविंदा थर लावत होते तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची लाइव्ह काॅमेंट्री रंगत चालली होती. जसे ९ थर लागले तसा मुख्यमंत्र्यांची काॅमेंट्रीही फुलली, हा अविस्मीरणीय क्षण आहेत, आजच्या २०१८ चे हे ९ थर सर्वांचं टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे, असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यामुळं स्वामी प्रतिष्ठानची पहिली हंडी जय जवानच्या ९ थरारामुळं आणि मुख्यमंत्र्यांच्या लाइव्ह काॅमेंट्रीमुळं अविस्मरणीय ठरली.



हेही वाचा-

बघा, एन. डी. स्टुडिओतील दहीहंडीत ‘सलमान’ 'असा' झाला सामील

ठिकठिकाणी दहीहंडीचा थरथराट सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा