Advertisement

केकपासून साकारला बाप्पा!


केकपासून साकारला बाप्पा!
SHARES

बाप्पाची अनेक रूपं आतापर्यंत आपण पाहिली आहेत. पण मुंबईतल्या एका मंडळानं केक आणि फॉनडंटपासून (केकवर लागणारं आयसिंग) गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. बाप्पाच्या मूर्तीला सुंदर सजवण्यात आलं आहे. ५.५ फुट उंच बाप्पाची मूर्ती अतिशय मोहक दिसत आहे. बाप्पा अवतरला आहे की काय? असा भास मूर्तीला पाहून होत आहे. 




गोडवा बाप्पाचा

मुंबईतल्या जितेकरवाडीत तुम्हाला केक आणि फॉनडंटपासून बनवलेला बाप्पा पाहायला मिळणार आहे. जितेकरवाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाला यावर्षी बाप्पाच्या हटके मूर्तीची स्थापना करायची होती. यासाठी शेफ बंटी महाजन यांनी त्यांना केक आणि फॉनडंट बाप्पाची कल्पना सुचवली. त्यानुसार बंटी महाजन यांनी बाप्पाची ही सुंदर मूर्ती साकारली आहे.  



मूर्तीसाठी प्रचंड मेहनत

बाप्पाची मूर्ती बनवण्यापासून ते मूर्ती सजवण्यापर्यंत प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. ज्वेलरी, धोतर, मुकुट याचे डिझाईन बंटी महाजन यांनी स्वत: तयार केले आहे. केक, फॉनडंट कोटिंग, एमब्रोडरी, मॉलडिंग. ३डी फिंगर्स, पेंटिंग या पद्धतींचा वापर करून मूर्ती साकारली आहे. बाप्पाची मूर्ती एका काचेच्या शोकेसमध्ये ठेवण्यात आली आहे. बाप्पाला लावण्यात आलेला दिवा आणि मोदक हे केकपासून बनवण्यात आले आहेत. फॉनडंटपासून वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे केक बनवले जातात. मग गणपती का नाही, हाच विचार करून शेफ बंटी महाजन यांनी ही मूर्ती साकारली आहे.  

तुम्हाला देखील बाप्पाचे दर्शन घ्यायचे असेल तर जितेकरवाडीला भेट द्या. २३ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉनडंट गणपतीचं दर्शन घेता येईल.



कुठे : जितेकरवाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, जितेकरवाडी, डॉ. बी. जे. मार्ग. ठाकूरवाडी, मुंबई ४००००२



हेही वाचा -

पाणीपुरीच्या पुरीतून साकारला ९ फूटांचा बाप्पा

अबब... एक किलोचा मोदक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा