Advertisement

अबब... एक किलोचा मोदक

मोदक म्हणजे बाप्पाचा आवडता नैवेद्य. मग बाप्पासाठी 'मोदकम' घेऊन आले आहेत एक किलोचा मोदक...

अबब... एक किलोचा मोदक
SHARES

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती आलेनेहमीप्रमाणेघराघरातून गणरायाचं स्वागत झालं.मोठाली मंडळं, प्रसिद्ध देवस्थानं यांचे गणपतीसुद्धा नेहमीप्रमाण गजबजले. गणरायाचे आगमन झाल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्यात सारे भक्त रंगले आहेत. या दहा दिवसांमध्ये विविध पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो

आता बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे दहा दिवस घराघरात बाप्पाला वेगवेगळे मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात. असाच एक हटके मोदक घेऊन 'मोदकम' आले आहेत


'मोदकम'च्या मोदकची खासियत

बाप्पाचा आवडता मोदक असल्यानं मोदकमनं यावर्षी चक्क एक किलोचा मोदक बनवला आहे. प्रभादेवी इथल्या सिद्धीविनायक मंदिराजवळ मोदकमचं छोटसं शॉप आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी खरेदी करता येतील. तांदूळ पीठाच्या उकडमध्ये खोबरं आणि गूळ यापासून बनवेलेलं सारण भरलं जातं आणि एक किलोचा मोठा मोदक साकारला जातो


याशिवाय तुम्ही सिलव्हर कोटेड मोदक आणि ड्रायफ्रुट मोदक देखील ट्राय करू शकता. एका मोदकासाठी तुम्हाला ३४ रुपये मोजावे लागतील. तुम्हाला देखील बाप्पाला मोठ्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर प्रभादेवी इथल्या मोदकमला नक्की भेट द्या.  


कुठे : मोदकम, /, एस.के.बोले मार्ग, सिद्धीविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी

संपर्क : ९१२२२४२२१०१२९१२२२४३११११२



हेही वाचा

...म्हणून बाप्पाला आवडतो मोदक

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा