Advertisement

गोरेगावचा काळा गणपती!

गणेश चतुर्थीपासून पुढील अकरा दिवस मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. या अकरा दिवसांत सार्वजनिक मंडळांसोबतच ठिकठिकाणच्या स्थानिक गणेश मंदिरांमध्येही उत्सवी माहोल असेल. अशा काही निवडक गणेश मंदिरांची 'मुंबई लाइव्ह'ने तयार केलेली फोटो स्टोरी खास तुमच्यासाठी.

गोरेगावचा काळा गणपती!
SHARES

गोरेगावमधील गणेशभक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे मोतीलाल नगर क्र. १ इथलं संकल्पसिद्धी गणेश मंदिर. दरवर्षी या गणपती मंदिरात मोठ्या उत्साहानं आणि पारंपारिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंदिरात गणेशोत्सवानिमित्त उत्सवी वातावरण तयार झालं आहे.


१७ जुलै १९६१ साली छोटी मूर्ती बसवून संकल्पसिद्धी गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यावेळी रामचंद्र भट्ट यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १९८० मध्ये गणपती मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. तर फेब्रुवारी १९८४ मध्ये माघी गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला मंदिरात काळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला मुंबईतील 'काळा गणपती' म्हणून ओळखलं जातं.


या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी माघी गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात महाप्रसाद ठेवला जातो. या महाप्रसादाचा लाभ केवळ गोरेगावमधीलच नव्हे, तर मुंबईतील विविध ठिकाणाहून येणारे भाविक घेतात.

या मूर्तीचं वैशिष्ट्य गणपतीच्या नावातच असल्याचं येथील स्थानिक सांगतात. हा 'संकल्पसिद्धी' असल्यामुळं या गणपतीसमोर व्यक्त केलेली इच्छा नक्कीच पूर्ण होते अशी इथं येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.


 त्यामुळं मोठ्या भक्तीभावानं स्थानिक 'संकल्पसिद्धी' मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.



हेही वाचा-

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...

गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलिस सज्ज, ५ चौपाट्यांवर नियंत्रण कक्ष



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा