Advertisement

दहिसरमधील दहीहंडीत शहीद शुभमच्या कुटुंबियांचा सन्मान


दहिसरमधील दहीहंडीत शहीद शुभमच्या कुटुंबियांचा सन्मान
SHARES

 संस्कार प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत यावर्षी पहिली सलामी शहीद जवानांना देण्यात आली आहे. यावेळी सीमेवर शहीद झालेल्या शुभम मुस्तापुरे या जवानाच्या कुटुंबाचा ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

शहिदांना मानवंदना 

संस्कार प्रतिष्ठानच्यावतीनं दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन येथे सकाळी ११ वाजल्यापासून दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंडळाचं यंदाचं १२ वं वर्षे असून या कार्यक्रमात शहीद शुभम सूर्यकांत मुस्तापुरे यांचं कुटुंबीय उपस्थित होतं. दहीहंडी फोडण्याची पहिली सलामी ही शहीद जवानांना देण्यात आली. याप्रसंगी शहिदांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. येथील ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान दहिसर पूर्वेच्या एकविरा गोविंदा पथकाने फोडली.


जम्मू- काश्मीरमध्ये शहीद

जम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर गेल्या एप्रिल महिन्यात पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील जवान शुभम मुस्तापुरे (वय २०) शहीद झाला होता. परभणीतील कोनरेवाडी गावाचा शुभम वयाच्या १८ व्या वर्षी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल झाला होता. प्रतिष्ठानच्यावतीने शिवसेना उपनेते व म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते मुस्तापुरे कुटुंबियांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, माजी नगरसेविका हंसाबेन देसाई, सुनिल चव्हाण, भालचंद्र म्हात्रे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर आदी उपस्थित होते. 



हेही वाचा - 

थर लावताना धारावीतील गोविदांचा मृत्यू!

जय जवानची ९ थरांची सलामी अन् मुख्यमंत्र्यांची लाइव्ह काॅमेंट्री




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा