Advertisement

नवरात्री स्पेशल - सव्वाशे साड्या परिधान करणारी 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी'!


नवरात्री स्पेशल - सव्वाशे साड्या परिधान करणारी 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी'!
SHARES

कामाठीपुरा येथील वंदे मातरम् क्रीडा मंडळाची देवी ही 'दक्षिण मुंबईची महालक्ष्मी' म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने देखाव्यातून जेजुरी गड साकारला आहे. नवरात्रीत या देवीला नऊ दिवस जवळपास सव्वाशेवर साड्या नेसवल्या जातात. गेली अनेक वर्षे देवीला साडी नेसवण्याचे काम निर्मलाताई पोटाबत्तीनी या आजी करतात. त्या अवघ्या तीन मिनिटांत देवीला साडी नेसवतात. कित्येक वर्ष हा त्यांचा नवरात्रीतील नित्यनेम आहे.


2041 पर्यंत मूर्ती देणगीचे बुकिंग फुल्ल!

भक्तांच्या श्रद्धेपोटी अर्पण झालेली प्रत्येक साडी देवीला नेसवली जाते. हे काम दिवसभर सुरूच असते. त्यात अजून एक खास बाब म्हणजे या मंडळाच्या देवीची मूर्ती भक्त दरवर्षी देणगी स्वरुपात देतात. अशा प्रकारे मूर्ती देणगी स्वरुपात देण्यासाठी आधीच बुकिंग केले जाते. अशी थेट 2041 पर्यंत आधीच नोंदणी झाली आहे. 

या देवीच्या मूर्तीची बुकिंग 2041 सालापर्यंतची झालेली आहे. हे मंडळ सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सामान्य भक्तांनाच मूर्ती नोंदीत प्राधान्य देत आहे. वंदे मातरम् क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यलगोंडा हे साडी विक्रेते आहे. 20 तोळे सोन्यापासून या देवीचा हात तयार करण्यात आला आहे. गळ्यातील मंगळसूत्रासह अन्य दागिनेही सोन्याचे आहेत.

देवीच्या विसर्जन मिरवणुकीस येथे हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. त्यामुळे नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवंत यांनी येथे उत्सवादरम्यान अनुचित घटना घडू नयेत, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला असून आम्हाला येथे राउंडअप करावा लागतो.

सचिन गायकवाड, बीट मार्शल

मुंबई, पुणे, नाशिक, कर्नाटक, हैदराबाद येथील भाविक नवरात्रीत या देवीच्या दर्शनासाठी येतात. रोज 125 पेक्षा अधिक साड्या या ठिकाणी अर्पण होतात. सोन्याचे अलंकार, चांदीचे पाळणे हे प्रामुख्याने अर्पण केलेले पहायला मिळतात.



हेही वाचा - 

जाणून घ्या नवरंगांच्या नवलाईमागचं सत्य!

'देवीला दान नको, पण गरीबांना कपडे द्या'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा