Advertisement

समाजात शांती, एकोप्यासाठी मिरवणूक


समाजात शांती, एकोप्यासाठी मिरवणूक
SHARES

शिवडी - रझा या संस्थेद्वारे शिवडीच्या क्रॉस रोड इथं गेल्या 16 वर्षांपासून ईद-ए-मिलादच्या निमित्तानं मिरवणूक काढली जाते. त्याप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीनं हजरत मौलाना सय्यद मोहम्मद खालिद अश्रफ यांच्या नेतृत्वखाली वडाळा ते शिवडी दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. समाजात शांती आणि एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशानं ही मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कोणत्याही ध्वनी प्रदूषणात्मक यंत्राचा वापर न करता पायी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता.

संबंधित विषय
Advertisement