Advertisement

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी

महिला बचत गटांनी बनवलेला फराळ यंदा चांगलाच महागला आहे. यंदा डाळ, तेल, सुके खोबरे, रवा, मैदा यांसारख्या दिवाळी फराळातील महत्त्वाचे जिन्नस १५ ते २० टक्क्यांनी महागल्यानं फराळाच्या किमतीही १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी
SHARES

दिवाळीचा रेडिमेड फराळ बाजारात आता ठिकाठिकाणी उपलब्ध असला, तरीही महिला बचत गटांनी बनवलेला फराळ यंदा चांगलाच महागला आहे. यंदा डाळ, तेल, सुके खोबरे, रवा, मैदा यांसारख्या दिवाळी फराळातील महत्त्वाचे जिन्नस १५ ते २० टक्क्यांनी महागल्यानं फराळाच्या किमतीही १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. 


म्हणून रेडिमेड फराळ महागला

मुंबईत नोकरदार महिला वर्गाला कामामुळे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी बऱ्याच स्त्रिया रेडिमेड फराळाचा पर्याय निवडतात. परंतु, यंदा तूरडाळीपासून ते शेंगदाण्यापर्यंत सर्वच किराणा मालाचे दर भडकल्याने रेडिमेड फराळालाही भाववाढीची फोडणी मिळाली आहे. डाळींसोबत बेसन, रवा, मैदा, शेंगदाणे, उडीद डाळ, मूगडाळ, मसूर या डाळींचे भाव वाढल्यानं फराळ बजेटमध्ये कसा बसवायचा? असा प्रश्‍न रेडिमेड फराळाच्या ऑर्डर्स घेणाऱ्या बचत गटांसमोर उभा राहिला आहे.


दिवाळीच्या फराळात करंजी, शंकरपाळी, चकली, चिवडा, चिरोटे, अनारसे, रवा लाडू, बेसन लाडू यांसह विविध वस्तूंना बरीच मागणी असते. परंतु यंदा घरगुती गॅसपासून सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने फराळाच्या किमतीही वाढल्या आहेत. 


रेडिमेड फराळाच्या किंमती अशा

  • लाडू (नग)  १२
  • चकली   २२०  
  • करंजी   ३००
  • शंकरपाळे  १६०
  • अनारसे   ३५०
  • पोहे चिवडा - १६०
  • तिखट शेव -१००
  • नानखटाई - १२०

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फराळ असं सगळंच आलं. मात्र यावर्षी महागाईमुळे रेडिमेड फराळाच्या किमती तब्बल १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसंच यंदा फराळासाठी लागणारे जिन्नस म्हणजे साखर, चणाडाळ, रवा, पिठीसाखर, मैदा, पोहे, बदाम, काजू यांच्या किमतीतही बरीच वाढ झाल्यानं घरातही दिवाळी साजरी करण्यास अडचणी येत आहेत.

- मधुरिमा परब, गृहिणी


हेही वाचा - 

दिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा