Advertisement

मालाडचं रिद्धीविनायक गणेश मंदिर


मालाडचं रिद्धीविनायक गणेश मंदिर
SHARES

वर्षभर आपल्या परिसरात असलेल्या गणेश मंदिरात जाऊन भक्तीभावानं गणेश भक्त बाप्पाची पूजा करत असतात. मालाडमधील अजित नगर येथील रिद्धीविनायक गणेश मंदिरही भक्तांनी नेहमी गजबजलेलं असतं.


मूर्ती राजस्थानमधून 

१९८५ साली श्री रिद्धीविनायक गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली.  यावेळी महेंद्र वोरा आणि दिनेश विरा यांच्या हस्ते या मंदिरातील गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती राजस्थानमधून आणण्यात आली आहे.

पारंपारिक गणेशोत्सव

माघी गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला या मंदिराची स्थापना करण्यात आली अाहे. स्थापना दिनानिमित्त मंदिरात दरवर्षी होम-हवन केलं जातं. यावेळी संपूर्ण मालाडमधील नागरिक मंदिरात  दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी या मंदिरात पारंपारिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणं दर मंगळवारी भजन-किर्तन या मंदिरात केले जाते.



हेही वाचा -


सामाजिकतेच भान जपणारा दादरचा मानाचा गणपती

शिवाजी पार्कातला उद्यान गणेश

गोरेगावचा काळा गणपती!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा