Advertisement

सजावटीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न


सजावटीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न
SHARES

दिवसेंदिवस माणसामधील संवेदना हरवत चालल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र माणसामधील हीच हरवलेली संवेदना सजवाटीतून मांडण्याचे काम जोगेश्वरीतील प्रमोद महाडिक यांनी केले आहे.




समाजप्रबोधनाचा संदेश...

व्यवसायाने शिक्षक असलेले जोगेश्वरी येथील प्रमोद महाडिक हे गेली 45 वर्षे गणेश सजावटीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा अविरत प्रयत्न करत आहेत. या वर्षी त्यांनी साकारलेला 'संवेदना' या विषयावर आधारित चलचित्र देखावा सगळ्यांचे मन हेलावून टाकत आहे. भुकेल्या पोटाला अन्न न देता लग्न, पार्टीत अन्न वाया घालवलं जातं. मोबाईल गेम्सच्या जमान्यात गावाकडील खेळ उपेक्षित राहतात. निरागस मुलांना वाढत्या स्पर्धेमुळे शाळा, क्लास या जंजाळात ओढलं जातं. यांसारखे अनेक मुद्दे त्यांनी सजावटीतून मांडले आहेत.



भावनिक वास्तवता प्रदर्शित करून गणरायाच्या साक्षीने मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयास त्यांनी केला आहे. असा बांधकामगार तयार करा की, जो दोन शेजाऱ्यांमध्ये सेतू निर्माण करेल, जो दोन माणसांमध्ये भावनिक कनेक्शन जोडू शकेल. असे अनेक संदेश त्यांनी आपल्या या सजावटीतून दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी स्वतःचा आवाज वापरला आहे.


गेली 45 वर्षे माझ्या घरी बाप्पा बसतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मी सजावटीच्या माध्यमातून विविध संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. 'मानवता हाच खरा धर्म, नाती जपा' यांसारखे अनेक विषय मी आजवर माझ्या सजावटीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रमोद महाडिक, शिक्षक



हेही वाचा - 

...म्हणून सागर कारंडेने गणपती बसवायला सुरवात केली!

गणेशोत्सवात बाहुबली ठरला मोदींना भारी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा