Advertisement

पथनाट्यातून साजरी होतेय गोकुळाष्टमी!

श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी देशविदेशात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

पथनाट्यातून साजरी होतेय गोकुळाष्टमी!
SHARES

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यात दहीहंडी फोडण्याची जोरदार तयारी सुरू झालीय. दहीकाला मंडळांनी कसून सराव केला असून सायंकाळपर्यंत शहरात शेकडो दहीहंड्या फुटल्याचं पाहायला मिळेल. पण स्वाध्याय परिवार दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी देशविदेशात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.  

स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या धनश्री श्रीनिवास तळवलकर यांच्या मार्गदर्शनाने 'एक भुलक्कड, कौन?.' या पथनाट्यातून भगवान श्रीकृष्णाचे विचार देशविदेशात पोहोचविण्यात येत आहेत. स्वाध्याय परिवारातील युवा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेनने १६ राज्यांत तसंच इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहेत. या सोहळ्यात तरुणांची सुमारे १५ हजार पथके सहभागी झाली आहेत.  

विविध भाषांमधून ही पथनाट्ये १६ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट, २०१९ या काळात सादर येत आहेत. २०१८ मध्ये स्वाध्याय परिवारातील सुमारे १४,५०० पथकांनी ६२,००० ठिकाणी ही पथनाट्ये सादर केली होती. जगभरातील ५४ लाख लोकांनी ही पथनाट्ये पाहिली होती. 



हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात महावितरणकडून सवलतीच्या दरात मिळणार वीज

नियम मोडल्यास गोविंदा पथकच जबाबदार- समिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा