Advertisement

तामिळ भाषिकांचा नवरात्रोत्सव अर्थात 'गोलू', सजावटीच्या मूर्ती खरेदीला वेग


तामिळ भाषिकांचा नवरात्रोत्सव अर्थात 'गोलू', सजावटीच्या मूर्ती खरेदीला वेग
SHARES

गणेशोत्सवानंतर आता सर्वांनाच वेध लागलेत ते नवरात्रोत्सवाचे. नवरात्रोत्सव विविध राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरात, महाराष्ट्र, कोलकाताप्रमाणेच तामिळनाडूतही या उत्सवाला विषेश महत्त्व आहे. 'गोलू' उत्सव म्हणून हा उत्सव प्रसिद्ध असून या उत्सवाच्या तयारीसाठी तामिळ भाषिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र माटुंग्यात दिसत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागांत अनेक वर्षांपासून 'गोलू' सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.



'या' मूर्तींचा समावेश

नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात घट किंवा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. परंतू 'गोलू' उत्सवात घटस्थापनेबरोबर सजावटीसाठी एका स्टिलच्या स्टँडवर देवी देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. यामध्ये राम, कृष्ण, गणपती, शंकर, पार्वती आदी देवतांच्या मूर्तींचा सामावेश असतो. त्याचबरोबर भारतातील संस्कृती दर्शवणाऱ्या देखाव्यांच्या मूर्ती देखील येथे मांडण्यात येतात. त्यामध्ये आदीवासी १२ बलुतेदार यांच्यासह हल्ली शहरीकरण झाल्यामुळे रोजच्या जीवनाशी निगडीत असलेले भाजीवाले, दुधवाले यांच्या इकोफ्रेंडली मूर्ती देखील सजावटीसाठी मांडलेल्या असतात. या मूर्ती शाडू, पेपर आणि लाकडापासून बनवलेल्या असतात.



'गोलू' उत्सवानिमित्त देशभरातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडावे, यासाठी या सजावटीच्या वस्तूंमध्ये विविधता पाहायला मिळते. पारंपरिक वाद्य वाजवणारे, बैलगाडी, उंट त्याचबरोबर अनेक प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत सजावटीसाठी उपलब्ध आहेत. नवरात्रीच्या ९ माळा घटाला चढवण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे. त्याचप्रमाणे विषम संखेत स्टेप (स्टीलचा रॅक) ठेऊन त्यावर मूर्ती ठेवून सजावट करणे ही तामिळ भाषिकांची प्रथा आहे.



'गोलू' उत्सवासाठी लागणाऱ्या या आकर्षक मूर्ती माटुंगा येथील गिरी स्टोरमध्ये उपलब्ध असून ५०० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत या मूर्तींच्या किंमती आहेत. 


दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या मूर्तींसह विविध लाकडी मूर्तीही पूजेसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. गेल्या ५० वर्षांपासून या सर्व मूर्ती चेन्नईतून विक्रीसाठी आणल्या जातात. गणेशोत्सवापासून नवरात्रोत्सव संपेपर्यंत या मूर्तींची खरेदी केली जाते.
- रेखा काशीविश्वनाथन, मूर्ती विक्रेत्या , गिरी स्टोर 


या सर्व इको फ्रेंडली मूर्ती चेन्नईमधून मागवण्यात आल्यामुळे यंदा जीएसटीमुळे मूर्तींच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. परंतु, या दरवाढीचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही रेखा म्हणाल्या.


हेही वाचा - 

गणेशोत्सवात बाहुबली ठरला मोदींना भारी!

तामिळनाडूचा 'बाहुबली गणेशा'!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा