आता पुरणपोळी आइस्क्रीमसुद्धा

 Dadar
आता पुरणपोळी आइस्क्रीमसुद्धा

दादर - गेल्या अनेक वर्षांपासून दादरकरांच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या दादरच्या आस्वाद उपाहारगृहात आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असलेल्या पुरण पोळ्यांप्रमाणेच पुरणपोळी आइस्क्रीमसुद्धा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातला पुरणपोळी हा खाद्यापदार्थ मुंबई शहरात रहात असलेल्या देशातल्या प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी हे आइस्क्रीम विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणण्याचे कारण महाराष्ट्रात होळीला घरोघरी पुरणाची पोळी बनवली जाते. हल्ली पुरणपोळ्यांचे विविध फ्लेवरही पाहायला मिळतात. पण याच पुरणपोळीचा फ्लेवर जर आइस्क्रीममध्ये मिळाला तर ग्राहकांना ते आवडेल का हे पहाण्यासाठी होळीच्या निमित्ताने हे आइस्क्रीम विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आस्वाद हॉटेलचे मालक सुर्यकांत सरजोशी यांनी हे हटके डेझर्ट बनवलय, त्याचे एकमेव कारण फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही पुरणपोळी लोकांपर्यंत पोहचायला हवी. जरी होळीच्या निमित्तानं त्यांनी 'पुरणपोळी आइस्क्रीम ' ग्राहकांसाठी बनवले असले तरीही होळीपासून हॉटेलमध्ये ते दररोज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

Loading Comments