Advertisement

खवय्यांसाठी गोरेगावमध्ये 'मॉन्सून मिसळ फेस्टिव्हल'

गरिबापासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ आवडते. मग मिसळप्रेमींसाठी गोरेगावमध्ये एक दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

खवय्यांसाठी गोरेगावमध्ये 'मॉन्सून मिसळ फेस्टिव्हल'
SHARES

मटकीची उसळ, त्यात बटाट्याची सुकी भाजी, थोडंसं फरसाण, वरून भुरभुरलेला कांदा, कोथिंबीर आणि त्यात गरमागरम झणझणीत तर्री आणि सोबतीला पाव... आहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचं एवढं वर्णन पुरेसं आहे. अशात जर पाऊस पडत असेल तर गरमागरम मिसळ खायला कुणाला नाही आवडणार? अशाच मिसळप्रेमींसाठी गोरेगावमध्ये एक दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.



अनलिमिटेड मिसळ

गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ खायला आवडतं. गावकरी असो वा शहरातला माणून, ज्याने कधी मिसळीची चव चाखली नाही, असं कोणी नसेल हे शक्यच नाही. वेगवेगळ्या शहरातल्या मिसळीची चव ही वेगळी असते. या सगळ्या ठिकाणच्या मिसळीला स्वत:चा असा स्वाद आणि रंग असतो. डॉमिनोज, मॅकडोनाल्डच्या खाऊगर्दीमध्ये देखील मिसळ आजही आपलं महत्त्व टिकवून आहे. अशी ही तर्रीदार, चटपटीत मिसळ खाण्याची संधी गोरेगावकरांना मिळाली आहे.



'सरस' या ग्रुप तर्फे गोरेगावमध्ये 'मॉन्सून मिसळ फेस्टिव्हल'चं आयोजन केलं आहे. फक्त एवढंच नाही तर तुम्ही इथं अनलिमिटेड मिसळ खाऊ शकता. मिसळ एकदा खाऊन पोट भरतं. पण मन काही भरत नाही. मग अशा खवय्यांना इथं मन भरून खाण्याची संधी मिळत आहे. यासाठी फक्त तुम्हाला १९९ रुपये मोजावे लागतील. १९९ रुपयांमध्ये पाहिजे तेवढी मिसळ खायला मिळणं म्हणजे भारीच ना!


मग तुम्ही जाणार की नाही झणझणीत, अशा मिसळीचा आस्वाद घ्यायला.

कधी : २९ जुलै २०१८
कुठे : दुसरा मजला, टोपीवाला सेंटर, गोरेगाव (प.)
संपर्क : ९९३०५१६४२३



हेही वाचा

'हे' वाचून ब्रेकफास्टला तुम्ही पोहेच खाल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा