Advertisement

'हे' वाचून ब्रेकफास्टला तुम्ही पोहेच खाल!

कांदेपोहे बनवायला जास्त वेळ पण जात नाही. अगदी बनवणं शक्य नसेल तर बाहेर तुम्हाला आरामात कांदेपोहे मिळतील. अनेक ठिकाणी कांदेपोहे विकायला स्टॉल उभारले जातात. नाश्त्यात सकाळी पोहे खाणं उत्तम असतं, हे तर आम्ही सांगितलं. पण हे सांगण्यामागे अनेक कारणं आहेत. ही कारणं कळली तर तुम्ही रोज सकाळी पोहेच खाल.

'हे' वाचून ब्रेकफास्टला तुम्ही पोहेच खाल!
SHARES

'ब्रेकफास्ट लाईक अ किंग' हा इंग्रजी सुविचार तुम्ही ऐकलाच असेल. आरोग्याच्या दृष्टीनंही सकाळचा पहिला नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. तो तुम्ही पोटभरून केलाच पाहिजे. अनेक जण सकाळचा नाश्ता करणं टाळतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. डॉक्टर देखील सकाळी नाश्ता करणं आवश्यक असल्याचं मानतात आणि सर्वांनाच हाच सल्ला देतात. पण 'ब्रेकफास्ट लाईक अ किंग' याचा अर्थ काहीही चटर फटर खायचं नसतं. असं काही तरी खाल्लं पाहिजे, ज्यामुळे तमची भूक देखील भागेल आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असेल. असा पदार्थ म्हणजे कांदे-पोहे.



कांदेपोहे बनवायला जास्त वेळ पण जात नाही. अगदी बनवणं शक्य नसेल तर बाहेर तुम्हाला आरामात कांदेपोहे मिळतील. अनेक ठिकाणी कांदेपोहे विकायला स्टॉल उभारले जातात. नाश्त्यात सकाळी पोहे खाणं उत्तम असतं, हे तर आम्ही सांगितलं. पण हे सांगण्यामागे अनेक कारणं आहेत. ही कारणं कळली तर तुम्ही रोज सकाळी पोहेच खाल


१) पोह्यात फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे पोहे खाल्ल्यामुळे शरीरात साखरेचं प्रमाण संतुलित राहतं.

२) पोहे बनवण्यासाठी तांदळाला उकडून अनेक तासांसाठी उन्हात सुकवलं जातं. या प्रक्रियेमुळे पोह्यात प्रोटिन्स आणि कार्ब्स तयार होतात. पचनासाठी ते उत्तम असतं

३) एक प्लेट पोह्यात जवळपास २५० कॅलरीज असतात. सोबतच यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात



४) पोह्यामध्ये ७७ टक्के कार्बोहाइड्रेट आणि ३३ टक्के फॅट असतात. यामुळे तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते

५) पोह्यांसोबत एक वाटी दही खाल्ल्यानं तुमच्या हाडांना मजबूती मिळते. तसंच कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

६) पोह्यामध्ये ग्यूटन नसतं. ग्यूटन नसल्यानं ते पचायला सोपं जातं. यामुळे पोटात गॅस होत नाही.


७) पोह्यात खूप मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. आयर्न शरीरासाठी आवश्यक असतं. पोहे शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढतात



हेही वाचा-

ब्रेकफास्ट तो बनता है बॉस!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा