Advertisement

'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड

थाळी ६० मिनिटात पूर्णपणे संपवली तर १.६ लाखांची रॉयल इनफिल्ड बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येईल.

'या' हॉटेलमध्ये बुलेट थाळी खा आणि बक्षिस म्हणून मिळवा रॉयल इनफिल्ड
SHARES

कोरोना लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंटमध्ये जास्त गर्दी नाही. जास्तीत जास्त लोक ऑनलाइन ऑर्डर करुन जेवण मागवत आहेत. मग आता ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये आणण्यासाठी आकर्षक ऑफर देत आहेत. पुण्याच्या एका रेस्टॉरंटनं देखील अनोखी शक्कल लढवली आहे.

शिवराज हॉटेलनं एक चॅलेंज सुरू केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीनं इथली जंबो थाळी ६० मिनिटात पूर्णपणे संपवली तर १.६ लाखांची रॉयल इनफिल्ड बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येईल.

हा उपक्रम सुरू करणाऱ्या शिवराज हॉटेलचे मालक अतुल वायकर यांनी सांगितलं की, 'ग्राहकांच्या कमीमुळे रेस्टॉरंटचा खर्च आणि स्टाफचा खर्च निघणंही कठीण झालं होतं. अशा वेळी आम्हाला ही कल्पना सुचली. जे कुणी व्यक्ती या भल्यामोठ्या ताटात वाढलेलं पूर्ण जेवण एकटे संपवेल त्याला आम्ही नवी कोरी बुलेट गिफ्ट करणार आहोत. यासाठी ६० मिनिटांचा वेळ ठरवण्यात आला आहे.'

सोशल मीडियावर 'बुलेट थाली'ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रातील दुसऱ्या शहरांमधूनही लोक इथं येत आहेत. २० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या चॅलेंजमध्ये आतापर्यंत ६० लोकांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र केवळ १ जणाला सोमवारी यश मिळालं. ही थाळी संपवणाऱ्या सोलापुरच्या सोमनाथ पवार यांना बुलेट गिफ्ट म्हणून मिळाली आहे.

बुलेट थाळीमध्ये लोकांना नॉनव्हेज व्यंजन मिळतात. यामध्ये एकूण १२ पदार्थ असतात. ज्यांचे वजन ४ किलो असते. हे तयार करण्यात ५५ लोक काम करतात. यामध्ये फ्राय सुराई, फ्राय फिश, चिकन तंदूरी, ड्राय मटन, सूखा मटन, चिकन मसाला आणि प्रॉन बिर्यानीचा समावेश आहे.हेही वाचा

केंद्र सरकारची व्हॉट्सअ‍ॅपला तंबी, पत्राद्वारे केला विरोध

व्हॉट्स अॅपला लागला 'सिग्नल'चा ब्रेक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा