Advertisement

व्हॉट्स अॅपला लागला 'सिग्नल'चा ब्रेक

व्हॉटस अॅपनं काही दिवसांपूर्वी युजर्ससाठी नवं धोरण जाहीर केल्यानंतर व्हॉटस अॅप सोडून देण्याकडे युजर्सचा कल वाढला आहे.

व्हॉट्स अॅपला लागला 'सिग्नल'चा ब्रेक
SHARES

व्हॉटस अॅपनं काही दिवसांपूर्वी युजर्ससाठी नवं धोरण जाहीर केल्यानंतर व्हॉटस अॅप सोडून देण्याकडे युजर्सचा कल वाढला आहे. याचा परिणाम म्हणजे युजर्स दुसऱ्या अपकडे वळले आहेत.

त्यापैकीच एक मेसिजिंग अॅप आहे सिग्नल.  मेसिजिंग अॅप सिग्नलचं डाऊनलोडिंग प्रचंड वेगानं केलं जात असल्याचं दिसून आलं आहे.

सिग्नल भारतात टॉप फ्री अॅप बनले आहेच पण जर्मनी, फ्रांस, ऑस्ट्रिया, फिनलंड, हॉंगकॉंग, स्वित्झर्लंड या देशात सुद्धा सिग्नलनं व्हॉटस अॅपला पछाडून टॉप फ्री अॅप बनण्याचा विक्रम केला आहे.

गेल्या दोन दिवसात अँड्राईड आणि आयओएस वरून १ लाखाहून अधिक संखेनं सिग्नल डाऊनलोड केलं गेलं आहे. तर २०२१च्या पहिल्या आठवड्यात व्हॉटस अॅप इन्स्टॉलेशन मध्ये ११ टक्के घट झाली आहे. काही वेळा सिग्नल डाऊनलोडिंग साठी इतकी गर्दी होते की ओटीपी व्हेरीफाय करायला वेळ लागतो असं रॉयटरनं म्हटलं आहे.

सिग्नलवर युजर्स मेसेज, ऑडीओ व्हिडीओ कॉल, फोटो, व्हिडीओ, लिंक शेअर अश्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे यात युजर्स डेटा फार अल्प प्रमाणात वापरला जातो. शिवाय इनक्रिपटेड डाटा बेस युजरच्याच फोनमध्ये सुरक्षित राहतो. डिसेंबर २०२० पासून सिग्नलनं ग्रुप व्हिडीओ ऑप्शन सुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

जगातील सर्वधिक श्रीमंत बनलेल्या एलन मस्क याचा मोठा हातभार सिंग्नलची लोकप्रियता वाढविण्यास लागला आहे. त्यांनी ट्विटर वरून ट्विट करून सिग्नल वापरत असल्याचं जाहीर केल्यावर सिग्नल डाऊन लोड करण्याचा वेग वाढल्याचं समोर आलं.हेही वाचा

रिलायन्स जिओची ग्राहकांना नववर्षाची भेट, केली महत्त्वाची घोषणा

जिओ २०२१ च्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement