Advertisement

रिलायन्स जिओची ग्राहकांना नववर्षाची भेट, केली महत्त्वाची घोषणा

रिलायन्स जिओने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. जिओचे सब्स्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

रिलायन्स जिओची ग्राहकांना नववर्षाची भेट, केली महत्त्वाची घोषणा
SHARES

रिलायन्स जिओने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून पुन्हा एकदा आपली कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे. 

जिओचे सब्स्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. IUC अंतर्गत जिओवरुन इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी जिओ १४ पैसे आकारत होती, तर नंतर ७ पैसे आकारले जात होते. हा चार्ज आता हटवण्यात आला असून १ जानेवारीपासून विनाशुल्क कॉलिंग करता येणार आहे. 

गुरुवारी याबाबतची माहिती रिलायन्स जिओने दिली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की पूर्णपणे जिओ ते जिओ याशिवाय इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क करता येणार आहेत. IUC शुल्क संपल्यानंतर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट (डोमेस्टिक वॉइस) कॉल मोफत करता येणार आहेत.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार, देशात १ जानेवारी २०२१ पासून Bill and Keep नियम लागू होणार आहे. त्यामुळे IUC चार्ज संपणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये IUC चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय IUC चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून IUC चार्ज आकारणार नाही असं स्पष्ट केलं होतं.हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा