Advertisement

जिओ २०२१ च्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करणार

मुकेश अंबानी म्हणाले, भारतातील ५ जी तंत्रज्ञानाची पायाभरणी रिलायन्स समुहाची जिओ कंपनी करणार आहे. जिओ २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी तंत्रज्ञान भारतात आणेल. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे.

जिओ २०२१ च्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करणार
SHARES

जिओ २०२१ या वर्षांच्या दुसर्‍या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. याबाबतची माहिती रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बोलताना दिली.  मंगळवाली झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 

मुकेश अंबानी म्हणाले, भारतातील ५ जी तंत्रज्ञानाची पायाभरणी रिलायन्स समुहाची जिओ कंपनी करणार आहे. जिओ २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी तंत्रज्ञान भारतात आणेल. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. भारतीयांना स्वस्त दरात मोबाइल मिळणे आवश्यक आहे. आजही भारतात ३० कोटी ग्राहक २ जी तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल वापरत आहेत. या लोकांच्या भल्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. 

सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. आपण सेमी कन्डक्टरसाठी केवळ आयातीच्या भरवशावर राहू शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत. असं असलं तरीही ३० कोटी ग्राहक २ जी फोनचाच वापर करत आहेत, असंही अंबानी यांनी यावेळी सांगितलं. 

रिलायन्स जिओने ४ जी नंतर ५ जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी केली आहे. सध्या भारतात ५ जी स्मार्टफोनची किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओ मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन ५ जी स्मार्टफोन  अवघ्या अडीच ते तीन हजार रुपयांत ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न करत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकारली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे. परंतु अजून आपल्याला खुप मोठा पल्ला गाठायचा असल्याचं सांगत करोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचं त्यांनी नमूद केलं. 



हेही वाचा -

कराड जनता बँक दिवाळखोरीत, आरबीआयकडून परवाना रद्द

जेट एअरवेज घेणार पुन्हा भरारी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा