Advertisement

एका सेंटीमीटरमुळे आंब्याचा विश्वविक्रम हुकला


एका सेंटीमीटरमुळे आंब्याचा विश्वविक्रम हुकला
SHARES

सध्या आंब्यांचा हंगाम सुरू आहे आणि उन्हाळ्यात आंब्याचा विषय निघाला तर तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. रायगड जिल्ह्यातील आंब्याचा विश्वविक्रम फक्त एका सेंटीमीटरमुळे हुकला आहे. उरणमधील एका घराशेजारील लॉनवरील आंब्याच्या झाडाला तब्बल 30 सेंटीमीटर आंबा लागला आहे.

मात्र जगातील सर्वात मोठा आंबा असल्याचा मान हा फिलिपीन्स या देशाच्या नावावर आहे. फिलिपीन्स मधील आंबा हा लांबीने 30 सेंटीमीटर इतका होता आणि उरण मधील आंबा हा देखील तेवढाच लांब असल्याने फिलिपीन्सचा रेकॉर्ड मात्र या आंब्याला तोडता आलेला नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा